दिवठाणा येथे डेंग्यूची लागण
By admin | Published: July 10, 2014 11:08 PM2014-07-10T23:08:25+5:302014-07-10T23:08:25+5:30
अनेक लोक त्रस्त असून, आजपर्यंत चार मुलांना डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाले आहे.
Next
दिवठाणा : मागील आठ ते दहा दिवसांपासून तापाच्या आजाराने लहान मुलांसह अनेक लोक त्रस्त असून, आजपर्यंत चार मुलांना डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाले आहे. दिवठाणा येथील रोशनी मधुकर वसू (वय १0 वर्ष) ही डेंग्यूच्या तापाने गंभीर आजारी असून, विशाल वसू, पवन वसू, प्रच्युदय वसू यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते; मात्र त्यांना सुटी देण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत एक पथक दिवठाणा येथे पाठविण्यात आले असून, खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाचे हे पथक दिवठाणा येथे मुक्काम ठोकून आहे. तापाच्या आजाराने ग्रासलेला रुग्ण आरोग्य सेवा पुरवित आहे.