भोरसाभोरसी येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:26 AM2017-10-18T01:26:15+5:302017-10-18T01:26:40+5:30
चिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

भोरसाभोरसी येथील साक्षी या १४ वर्षीय मुलीला ९ ऑक्टोबर रोजी डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याने औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे व पावसामुळे गावात सर्वत्र घाण पाणी साचले असून डासांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे गावात तातडीने उपाययोजना राबविण्यात येऊन डेंग्यूविरोधी औषधाची फवारणी करण्यात यावी व एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रांने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी गणेश भुसारी, एन.टी. भुसारी, रामेश्वर भुसारी, शे. बिसमिल्ला, आयुब, शे. युनुस, देवेंद्र भुसारी, नारायण आकाळ, प्रताप ढोरे यांनी केली आहे.