देऊळगावराजा : सामाईक जमिनीमधील मुरुम खासगी कंपनीला विकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:02 AM2018-02-06T01:02:39+5:302018-02-06T01:05:59+5:30
देऊळगावराजा : तालुक्यातील भिवगाव बु. येथील सामायिक शेतजमिनीमधील मुरुम कंपनीला विकल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी अनिल एकनाथ आमटे, विक्रम बबन आमटे, राधाकिसन आमटे यांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : तालुक्यातील भिवगाव बु. येथील सामायिक शेतजमिनीमधील मुरुम कंपनीला विकल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी अनिल एकनाथ आमटे, विक्रम बबन आमटे, राधाकिसन आमटे यांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे केली आहे.
मौजे भिवगाव शिवारात गट नं. १७३ मध्ये आमच्या सर्वांच्या मालकीची सामायिक शेतजमीन आहे. सदर गटनंबरमधील जमिनीचे वाटणीपत्र झालेले नसताना व विश्वासात न घेता, कोणतीही विचारपूस न करता कंपनीला सदर जमिनीच्या क्षेत्रातील मुरुम विकण्यात आलेला आहे. या प्रकाराची माहिती कळताच शेतकर्यांनी घटनास्थळावर जावून पाहणी केली असता, जेसीबी नं. एमएच २८ एजे ३६३0 ने मुरुम उकरण्याचे काम सुरू होते आणि ट्रॅक्टर क्र. एमएच २८ एजे ५५९१, एमएच २८- एजे ५७७२, एमएच २८- एवाय ४७५६, एमएच २१ - एडी ५६0६ या चार ट्रॅक्टरमधून मुरुमाची वाहतूक खासगी कंपनीकडे सुरू होती. जमिनीची वाटणी झालेली नसताना परस्पर मुरुमाची चोरी करून खासगी कंपनीला विकल्याप्रकरणी संबंधित दोषी व जेसीबीमालक, ट्रॅक्टरमालक यांच्यावर कठोर कारवाई करून मुरुम खोदकामासाठी वापर केले. जेसीबी वाहतूक करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर ही सर्व वाहने जप्त करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा इशारा अनिल आमटे, विक्रम आमटे, राधाकिसन आमटे रा.भिवगाव यांनी दिला आहे.