कोविड लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:46+5:302021-01-16T04:38:46+5:30
सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय संपूर्ण शासकीय कर्मचारी तसेच खासगी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची ...
सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय संपूर्ण शासकीय कर्मचारी तसेच खासगी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची माहिती संकलन करून बुलडाणा येथे पाठवण्यात आली आहे. यामध्ये तालुक्याच्या दृष्टीने समिती नेमण्यात आली असून, यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती दर आठवड्याला बैठकीचे आयोजन करत असून, यामध्ये लसीकरणाबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. लसीकरणाबाबत तीन खोल्या उपलब्ध केल्या आहेत. वेटिंग रूम यामध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी हे शासकीय आहेत की नाही, यासाठी पोलीस त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना आत प्रवेश देतील. यामध्ये ती व्यक्ती तंदुरुस्त आहे की नाही, याची तपासणी करून त्यानंतर त्यांची नोंद करण्यात येणार आहे. दुसरी खोली ही कोविड शिल्ड लसीकरणाची आहे. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नोंद केलेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना या रूममध्ये नेऊन त्यांना लस देण्यात येईल. लस दिल्यानंतर तीन नंबरची खोलीत प्रतीक्षालय आहे. व्यक्तीला लसी दिल्यानंतर त्या खोलीमध्ये अर्धा तास बसविण्यात येणार आहे. त्याला कुठल्या प्रकारचे त्रास जाणवत असतील, तर त्याला आयएफआयची किट उपलब्ध असेल. त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येईल, अशी व्यवस्था तीन खोल्यांमध्ये करण्यात आली आहे. अगोदर लस ही आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार असून, त्यानंतर शिक्षक, पोलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यानंतर ज्यांचे वय ५० वर्षे वरील आहे, अशांना सर्व तपासणी करून लस देण्यात येईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र साळवे यांनी दिली.