शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी

By admin | Published: January 3, 2015 12:56 AM2015-01-03T00:56:09+5:302015-01-03T00:56:09+5:30

रेती तस्करांमध्ये खळबळ ; दोन्ही तहसीलदारांकडून चाचपणी.

Departmental Investigation of Shegaon's two employees | शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी

शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी

Next

फहीम देशमुख /शेगाव
रेती तस्करांकडून मलीदा जमा करणार्‍या काही महसूल कर्मचार्‍यांचा भंडाफोड ह्यलोकमतह्णने केल्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. या स्टिंग ऑपरेशनची दखल घेत शेगाव आणि बाळापूरच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची चाचपणी केली असुन शेगावच्या दोन कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बाळापूर तहसील कार्यालयातील एक अधिकारी व दोन कर्मचार्‍यांना शेगाव शहरालगत वाहने अडवून त्यांचेकडून पैसे गोळा केले जात असताना लोकमतने स्टींग ऑपरेशन केले. बाळापूर तहसीलमधील काही कर्मचारी शेगावच्या हद्दित तर शेगाव तहसील कार्यालयातील काही कर्मचारी बाळापूर तालुक्याच्या हद्दित जावून हा प्रकार करीत असल्याचे लोकमत चमुला तीन दिवसांच्या पाहणीतून निर्देशनास आले. बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत संबंधित कर्मचार्‍यांकडून जाब-जबाब घेतले. दुसरीकडे शेगावचे तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्या वाहनावरील चालकाचे कारनामे उघडकीस आल्यानंतर त्यांनीही चालकास चांगलेच धारेवर धरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या स्टींग ऑपरेशमध्ये संबंधित अधिकारी तीन रेतीच्या वाहनांना ताब्यात घेताना दिसला. त्यांच्याकडून अवैधरित्या १५ हजार रुपयांप्रमाणे वसूल केले; मात्र स्टींग ऑपरेशन झाले असल्याची माहिती संबधीत अधिकार्‍यांना मिळताच, दोन वाहनांच्या रक्कमा शासनदप्तरी जमा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र एका वाहनाचे १५ हजार रुपये वृत्त लिहेपर्यंत शासन दप्तरी जमा करण्यात आले नव्हते. उल्लेखनीय म्हणजे जी वाहने शेगाव शहरात पकडली, त्या वाहनांच्या पंचनाम्यामध्ये संबंधित अधिकार्‍याने घटनास्थळ अकोला जिल्ह्याचे दाखविले आहे.
घटनेच्या तीन दिवसापूर्वीही याच चमूने शेगाव लगतच्या लोहारा गावात धाड टाकून दंडाच्या नावाने ३५ हजार रुपये गोळा केले होते. त्याचीही नोंद ्रुकुठेच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. दोन्ही तहसीलदारांनी रेती तस्कराविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे संबधीत तस्करांना फक्त तहसीलदारांचे लोकेशन देणे आणि पकडलेली वाहने सोडून देण्यासाठी सुद्धा हप्तेखोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे.

Web Title: Departmental Investigation of Shegaon's two employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.