आगार प्रमुखास घेराव

By admin | Published: September 5, 2014 12:21 AM2014-09-05T00:21:14+5:302014-09-05T00:21:14+5:30

बुलडाणा येथील स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचा आगार प्रमुखास घेराव.

Depot chief | आगार प्रमुखास घेराव

आगार प्रमुखास घेराव

Next

बुलडाणा : गुम्मी, तराळखेड, मासरुळ येथील विद्यार्थ्यांंसाठी बसफेरी उपलब्ध करुन द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने आज ४ सप्टेंबर रोजी बुलडाणा आगारचे प्रमुख सावळे यांना घेराव घालण्यात आला.
तालुक्यातील मढ ते धाड या मार्गावर गुम्मी, तराळखेड, मासरुळ येथील शेकडो विद्यार्थी ये-जा करतात, मात्र नियमित पास काढूनही पुरेश्या बसफेर्‍या नसल्यामुळे विद्यार्थ्यांंंना त्रास सहन करावा लागतो. या अनियमित बसफेरीमुळे शेतकरी व नोकरदार वर्गालाही मोठा फटका बसला आहे. या आशयाची तक्रार विद्यार्थ्यांंंंनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेकडे केली. यानुसार आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंदन यांनी विद्यार्थ्यांंंसह आगारप्रमुख सावळे यांना बसस्थानकावर घेराव घातला.
यावेळी मढ ते धाड या गावांदरम्यान तत्काळ बसफेरी सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेत बसफेरी तत्काळ सुरु करण्याचे आश्‍वासन सावळे यांनी दिले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे राजु जाधव, योगेश डवरे, स्वप्निल नागपुरे, पांढुरंग बोरकर, अंकुश साळवे, सतिश काळे, अजय दांडगे, शुभम नरोटे, राहुल ओडकर, गणेश नरोटे, प्रदिप नरोटे, गणेश वाघ, गणेश मदनकर, संतोष भगत, काशिनाथ नरोटे, विशाल नरोटे, यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

**काटोडा बसफेरी वारंवार रद्द
चिखली आगाराची चिखली येथून सकाळी सुटणारी व सावखेड नागरे पाडळी शिंदे या परिसरात सकाळी ८.३0 वाजता येणारी चिखली काटोडा देऊळगावराजा ही बसफेरी वारंवार रद्द आहे. चिखली आगाराकडून सदर बसफेरी रद्द होत असल्यामुळे नोकरदारवर्ग, विद्यार्थी, शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पाडळी शिंदे परिसरातील मेंडगाव, सावरखेड नागरे, नागनगाव, सुरा, सरंबा, देऊळगाव मही येथील नागरिकांना तालुका ठिकाणी तसेच सिंदखेडराजासाठी सदर बसफेरी उपयुक्त आहे. मात्र गेल्या एक महिण्यापासून सदरबसफेरी वारंवार रद्द होत आहे. यामुळे या मार्गावरील विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदारवर्गाची मोठी तारांबळ उडते, चिखली बसआगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Depot chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.