वंचित बहुजन आघाडीचे शुक्रवारी धरणे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:05 AM2021-03-04T05:05:14+5:302021-03-04T05:05:14+5:30
वर्षभरात चांगेफळ येथील तीन ग्रामसेवकांची बदली सिंदखेडराजा : तालुक्यातील चांगेफळ ग्रामपंचायतमध्ये वर्षभरात तीन ग्रामसेवकांची बदली झाली आहे. त्यामुळे, गावाच्या ...
वर्षभरात चांगेफळ येथील तीन ग्रामसेवकांची बदली
सिंदखेडराजा : तालुक्यातील चांगेफळ ग्रामपंचायतमध्ये वर्षभरात तीन ग्रामसेवकांची बदली झाली आहे. त्यामुळे, गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. अंतर्गत राजकारणामुळे ग्रामसेवकांच्या बदल्या हाेत असल्याची गावात चर्चा आहे.
ऑस्टाेमी रुग्णांना दिव्यांग दर्जा देण्याची मागणी
बुलडाणा : ऑस्टाेमी रुग्णांना दिव्यांगांचा दर्जा देऊन त्यांना साेयी- सवलती देण्याची मागणी कमलापुरी वैश्य समाज महामंऋी राजेंद्रप्रसाद गुप्ता, ऑस्टाेमी असाेसिएशनचे सचिव शेखर ठाकूर यांनी केली आहे.
बाेगस बक्षीसपत्र केल्याची तक्रार
बुलडाणा : चांडाेळ येथील वडिलाेपार्जीत शेतीचे बाेगस बक्षीसपत्र करून नाेंद केल्याची तक्रार लीलाबाई सराेदे, सिंधुबाई उगले यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गॅस दरवाढ झाल्याने स्वयंपाक पुन्हा चुलीवर
धामणगाव बढे : गत काही दिवसांपासून गॅसच्या दरात माेठी वाढ हाेत असल्याने गृहिणी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र धामणगाव बढे परिसरात दिसत आहे. उज्ज्वला याेजनेतंर्गत अनेकांना माेफत गॅस मिळाला असला तरी दरवाढ झाल्याने गॅस परवडत नसल्याचे चित्र आहे.
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
डाेणगाव : येथील मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्तत उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे, वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
देऊळगाव राजात रानडुकरांचा हैदाेस वाढला
देऊळगाव राजा : तालुक्यातील शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. मोठ-मोठे कळप मुक्त संचार करत असल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
सशक्त बालक देशाचे आधारस्तंभ : काेकाटे
लाेणार : सशक्त बालके हे देशाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन टिटवी येथील सरपंच भगवानराव काेकाटे यांनी केले आहे. ते टिटवी येथे १ मार्च राेजी आयाेजित जंतूनाशक माेहिमेच्या प्रारंभप्रसंगी बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या गाेदावरी काेकाटे या हाेत्या.
लॉकडाऊन न करता यातून पर्यायी मार्ग काढा
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनासह प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन न करता यातून पर्यायी मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे गोपाल तायडे यांनी केली आहे.