पाडळी शिवारातील हातभट्टीचे अड्डे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:28 PM2017-09-17T19:28:49+5:302017-09-17T19:32:33+5:30

अवैधरित्यागावठी दारूची निर्मिती करणाºया हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून हे अड्डे नष्ट केले आहेत. या वेळी गावठी दारू काढणाºया चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच मोह सडवा दारू जागीच नष्ट केला. ही धडक कारवाई शनिवारी पाडळी शिवारात करण्यात आली. 

Destruction of picketing of pistil Shivaras | पाडळी शिवारातील हातभट्टीचे अड्डे नष्ट

पाडळी शिवारातील हातभट्टीचे अड्डे नष्ट

Next
ठळक मुद्देचौघे ताब्यातराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अवैधरित्यागावठी दारूची निर्मिती करणाºया हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून हे अड्डे नष्ट केले आहेत. या वेळी गावठी दारू काढणाºया चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच मोह सडवा दारू जागीच नष्ट केला. ही धडक कारवाई शनिवारी पाडळी शिवारात करण्यात आली. 
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनात १५, १६ सप्टेंबर या दोन दिवसांत जिल्ह्यात अवैध दारू संदर्भात मास्क रेडचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, शनिवारी पाडळी शिवारातील देवीच्या मंदिराजवळील दरीमध्ये काही जण गावठी दारू काढत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकातील कर्मचाºयांनी धाड टाकली असता, पाडळी येथील भीमराव राजू मगर, सागर राजू मगर, संजय भीमराव पगारे अविनाश जाधव हे चार जण हातभट्टीची दारू काढताना दिसून आले. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून १५ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोहाचा सडवा दारू जागेवरच नष्ट केली. ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण, विशालसिंग पाटील अमोल सुसरे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक चव्हाण करत आहेत. 

Web Title: Destruction of picketing of pistil Shivaras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.