कृषी विभागाने मागविला बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा तपशील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:27 AM2017-11-29T01:27:31+5:302017-11-29T01:29:21+5:30

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात सापडला असून,  कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकर्‍यांचा आक्रोश आणि  विरोधकांचा प्रचंड दबाव यामुळे तत्काळ नसले तरी नजीकच्या काळात  शासनाकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

Details of loss sought by Agriculture Department | कृषी विभागाने मागविला बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा तपशील!

कृषी विभागाने मागविला बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा तपशील!

Next
ठळक मुद्देकापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा!

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात सापडला असून,  कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकर्‍यांचा आक्रोश आणि  विरोधकांचा प्रचंड दबाव यामुळे तत्काळ नसले तरी नजीकच्या काळात  शासनाकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून मोताळा तालुक्यातील शेतकर्‍यांकडून विहित नमुन्यात  नुकसानाची माहिती मागविण्याचे काम कृषी विभागातर्फे आरंभ करण्यात आले  आहे. 
कृषी विभागातर्फे मिळालेला नमुना जी या विहित तक्रार अर्जात कापूस उत्पादक  शेतकर्‍यांनी बीज निरीक्षक मोताळा यांच्याकडे माहिती सादर करावयाची आहे.  या तक्रारीनुसार बीज निरीक्षक अहवाल सादर करेल. अर्जासोबत शेतकर्‍यांना  बियाणे खरेदीची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने मोताळा तालुक्यातील हजारो हेक्टर कपाशीचे पीक  नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शे तकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसानाची माहिती व कारणे बियाणातील  दोष, उत्पादनातील घट याची माहिती शासनास मिळणार आहे, तर तत्काळ मद तीची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. नुकसान भरपाईचे किंवा मदतीचे   स्पष्ट आदेश  शासनाकडून नसले तरी शेतकर्‍यांनी विहित नमुन्यात माहिती भरून देण्याचे  आवाहन कृषी सहायक दीपककुटे यांनी केले आहे. 

रोगापेक्षा इलाज भयंकर
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असताना शासनाने तत्काळ मदत  करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांकडून विहित नमुन्यात मागविलेली माहिती अत्यं त क्लिष्ट आहे. त्यामध्ये बियाणाचा तपशील, संकरित प्रकार, संच (लॉट),  बियाणाचा प्रमाणित दर्जा, कंपनीचे नाव, विक्रेत्याचे नाव व पत्ता, रोखीची टि पणी, अंकुरण्याची टक्केवारी, बियाणाची वैधता, पेरणीचा तपशील, पेरणीचा  दिनांक, बियाणाची संख्या, कमी उगवलेले बियाणे, कीड व रोगाचा प्रादुर्भाव  झालेले बियाणे याची माहिती मागविली आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर  अशी परिस्थिती शेतकर्‍यांची झाली आहे.
 

Web Title: Details of loss sought by Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.