देऊळगावराजा : धोत्रानंदईत महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:37 AM2018-02-14T00:37:20+5:302018-02-14T00:37:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा: राज्य महामार्गावरील देऊळगावराजा तालुक्यात असलेल्या धोत्रानंदई गावात असलेल्या प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी तालुक्यातील हजारो भाविक दाखल झाले होते.
या मंदिराची निर्मिती सतराव्या शतकात राजा रामदेवराय यांच्या पंडितांनी बांधण्याचा मनोदय केल्याची आख्यायिका आहे. आकाराने मोठय़ा असलेल्या एका दगडामध्ये कोरीव काम करून हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे. दर्शनानंतर याच दरवाजातून भाविकांना परतावे लागते. गोल घुमट असलेल्या मंदिरात नेहमीच अंधार असतो. मंदिराच्या गाभार्यात महादेवाच्या पिंडीजवळ तेवत असलेल्या दिव्याचा प्रकाश पडतो. मंदिराच्या बाजूला दगडाने निर्मिलेली बारव असून, ते स्थान नौद्या सौंद्या म्हणून प्रचलित आहे. नौंद्या सौंद्या या दोन्ही मुली राजाच्या होत्या. त्यांच्या वास्तव्याचा बराच काळ धोत्रानंदईत गेल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणच्या बारवमध्ये आंघोळ केल्यास किंवा बारवमधील पाण्याने शरीर धुतल्यास त्वचारोगासह बरेच दुर्धर आजार बरे होतात, अशी भाविकांची धारणा आहे.
सदर मंदिर देऊळगावराजा ते चिखली रोडवर दे. राजापासून २६ कि.मी. व धोत्रानंदई फाट्यापासून पूर्वेला ४ कि.मी. अंतरावर आहे. दे. राजा तालुक्या तून व धोत्रानंदईच्या पंचक्रोशीत येणार्या २५ ते ३0 गावांमधून वयोवृद्ध, महिला, पुरुष, बालगोपाळांची पावले मिळेल त्या वाहनाने, o्रद्धेपोटी पायी चालत महादेवाचे मंदिराच्या उंबरठय़ावर दाखल होतात. यावेळी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेल्या सौद्या सौंद्याचे बारवाजवळ दर्शन घे तात. मंदिराच्या बाहेरच्या परिसरातील मैदानात यात्रा आयोजित करण्यात आली होती. हॉटेल, शीतपेये, विविध स्टॉल, दुकाने, लहान मुलांना खेळण्यासाठी आकाशपाळणे दाखल झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण धोत्रानंदई परिसर भक्तांनी फुलून गेला होता. सासुरवाशीणीसह माहेरवाशीनी सुध्दा महाशिवरात्रीच्या निमित्ताने धोत्रानंदईत दर्शनासाठी आले होते. कुठलाही गोंधळ, गडबड न होता आलेल्या भाविकांनी शांततेत व शिस्तीमध्ये दर्शन घेतले.
मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
या परिसरात व तालुक्यात एकमेव हेमाडपंती महादेवाचे मंदिर असूनही पुरा तत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी कुठल्याच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. हे मंदिर पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे म्हणून लोकप्र ितनिधींकडून प्रयत्न होत नाही. धोत्रानंदई गावासाठी हे मंदिर o्रद्धास्थान असल्यसाने ग्रामस्थच या मंदिराच्या देखभालीची काळजी घेतात. पुरातत्त्व विभागाने या मंदिराच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांची आहे.
बाबा बर्फानी अमरनाथ सेवा संघातर्फे फराळाचे वाटप
महाशिवरात्रीनिमित्त येथील बाबा बर्फानी अमरनाथ सेवा संघाच्या वतीने स् थानिक बसस्थानक परिसरात शिव भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. गत ७ वर्षांपासून बाबा बर्फानी अमरनाथ सेवा संघातर्फे महाशिवरात्रीनिमित्त साबुदाना उसळ फराळाचे वाटप करण्यात येते. आजच्या ८व्या वर्षी २१ िक्वंटल फराळाचे वाटप करण्यात आले. सकाळी १0 वाजेपासून सुरू झालेले फराळ वितरण दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सेवा संघाचे राजू चिंचोळकर, राजू भालेराव, श्याम वाघ, उमेश वाघ, सागर डिडोळकर, धर्मेद्र पवार, मुकेश उबाळे, लोखंडे आबा, माणिक वाघ, दी पक पधांडे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी भाविकांनी फराळ प्रसादाचा लाभ घेतला.