देऊळगावराजा : गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक; तीन ट्रॅक्टर पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:25 AM2018-01-17T01:25:41+5:302018-01-17T01:29:41+5:30

अंढेरा : देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटातून विनापरवाना वाहतूक होत असलेल्या रेतीसह महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले आहे. १६ जानेवारीला सकाळी सात वाजता तहसीलदार दीपक बाजड व त्यांच्या पथकाने देऊळगाव महीनजीक डिग्रस बुद्रुक येथील रेती घाटावर छापा टाकून ही कारवाई केली.

Deulgaavaraja: Unauthorized transport of minor minerals; Three tractors caught! | देऊळगावराजा : गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक; तीन ट्रॅक्टर पकडले!

देऊळगावराजा : गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक; तीन ट्रॅक्टर पकडले!

Next
ठळक मुद्देखडकपूर्णा नदीवरील रेती घाटातून विनापरवाना वाहतूक रेतीसह महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटातून विनापरवाना वाहतूक होत असलेल्या रेतीसह महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले आहे. १६ जानेवारीला सकाळी सात वाजता तहसीलदार दीपक बाजड व त्यांच्या पथकाने देऊळगाव महीनजीक डिग्रस बुद्रुक येथील रेती घाटावर छापा टाकून ही कारवाई केली.
यामध्ये रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये रवींद्र भास्कर लाड यांचे  ट्रॅक्टर  एमएच-२८-एजी-६२९९, दत्तात्रय उद्धव मांटे यांचे ट्रॅक्टर (क्र. एमएच-२८ जीए-२७९८), मदन नारायण मिसाळ यांचे एमएच-२८-टी-८१३९ असे तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. हे तीनही ट्रॅक्टर सध्या अंढेरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, ६0 हजार रुपयांचा महसूल या कारवाईमुळे वाचला आहे. तालुक्यातील काही रेती घाटावरून सध्या विनापरवाना रेतीची वाहतूक होत असून, शासनाचा महसूल त्यामुळे बुडत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेती माफिया रेतीची अवैधरीत्या वाहतूक करती असल्याची ओरड आहे.  त्यानुषंगाने माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव राजाचे तहसीलदार यांनी स्वत: रेती घाटावर उपस्थित राहून शासनाचा महसूल बुडणार नाही, याची काळजी घेत ही कारवाई केली. 
दरम्यान, विना परवाना रेती वाहतुकीला लगाम लावण्याचा आमचा प्रयत्न असून, शासनाचा महसूल बुडणार नाही, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार  दीपक बाजड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दरम्यान, देऊळगाव राजा तहसील कार्यालयाने यापूर्वी ही निमगाव गुरूसह लगतच्या पट्टय़ात धडक कारवाई करून मोठय़ा प्रमाणावर गौण खनिजाची विनापरवाना होणारी वाहतूक आणि चोरी उघडकीस आणली होती. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यातच महसूल विभागाने त्यादृष्टीने पथके नियुक्त केली आहेत. ही पथके सध्या जिल्ह्यात सक्रिय झाली असून, त्यांतर्गत सध्या ही कारवाई होत आहे.

Web Title: Deulgaavaraja: Unauthorized transport of minor minerals; Three tractors caught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.