देऊळगाव मही ठरते कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:14+5:302021-04-29T04:26:14+5:30

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथे काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गावातील ...

Deulgaon Mahi is the hotspot of Corona | देऊळगाव मही ठरते कोरोनाचा हॉटस्पॉट

देऊळगाव मही ठरते कोरोनाचा हॉटस्पॉट

Next

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथे काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गावातील दाेघांचा मृत्यू झाला, तर एकाच दिवसात ३१ नव्या रुग्णांची नाेंद झाल्याने देऊळगाव मही काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. काेराेनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, ग्रामस्थ नियमांच उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळलेले असून, देऊळगाव मही हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. एप्रिलमध्ये महिन्यात सुरुवातीला दररोज पाच ते दहा नवे रुग्ण सापडत असताना, २७ एप्रिल रोजी ३१ नवे रुग्ण तर यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

देऊळगाव महीची सुरक्षा रामभरोसे

देऊळगाव मही परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. परिसरातील नागरिक देऊळगाव मही येथे खरेदी करण्यासाठी येत आहे. मात्र, देऊळगाव मही येथे प्रशासनाच्या सूचना पायदळी तुडवला जात असल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. देऊळगाव महीत एकही रुग्ण नव्हता, तेव्हा विनामस्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले हाेते. दुसरी लाट माेठी असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत आहे.

जनता कर्फ्यूची गरज

देऊळगाव महीत व परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. ही साखळी न तोडल्यास गावच्या गावाला कोरोनाचा विळखा बसू शकतो़. जेव्हा गावाशेजारी एक रुग्ण सापडला, तेव्हा देऊळगाव महीची बाजारपेठ बंद देऊन जनता कर्फ्यू पाळला़. आता मात्र, देऊळगाव महीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून, या ठिकाणी जनता कर्फ्यूची गरज असल्याचे मत अनेक जाणकार यांनी व्यक्त केले.

नागरिकांनी नाहक घराबाहेर पडू नये : तहसीलदार

आपले गाव आपली जबाबदारी समजून सरपंच, पोलीस पाटील व प्रत्येक ग्रामस्थाने तर माझं घर, माझं कुटुंब याचे भान ठेवून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने शारीरिक अंतर ठेवण्यासोबतच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने स्वतःला अग्रस्थानी ठेवून गृहविलगीकरणाचा अवलंब करावा, सर्वांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे. लक्षणे दिसतात, तेव्हा नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सारिका भगत यांनी नागरिकांना केले.

Web Title: Deulgaon Mahi is the hotspot of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.