देऊळगाव राजा शिवसेनाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:08+5:302021-07-30T04:36:08+5:30
खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वामध्ये २९ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पूरग्रस्त ...
खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वामध्ये २९ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पूरग्रस्त भागात मदत म्हणून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या. बस स्थानक चौकात एस.टी. महामंडळच्या मालवाहू वाहनाद्वारे हे साहित्य रवाना करण्यात आले. कोकण विभागात अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले. अनेक नागरिक बेघर झाले. तर शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही संकटकाळी धावून जाऊन मदत करण्याची असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला देऊळगाव राजा तालुक्यातूनही चांगला प्रतिसाद देण्यात आला. खा. प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातुन १ हजार ३०० क्विंटल, तर देऊळगाव राजा नगरीतून ११० क्विंटल अन्न धान्य पाठविण्याची व्यवस्था केली.
भगवा झेंडा दाखवून वाहन रवाना
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर यांनी मालवाहू वाहनाला भगवा झेंडा दाखवून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धान्य घेऊन जाणारे वाहन रवाना करण्यात आले. याप्रसंगी तालुका प्रमुख दादाराव खारडे, शिवसेना नेते शिपणे, माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे, विजय उपाध्ये, उपाध्यक्ष पवन झोरे, नंदन खेडेकर, संदीप नागरे, वसंतआप्पा खुळे, जगदीश कापसे, गिरीश वाघमारे, अभय दीडहाते, आतिश खरात, विवेक खेडेकर, सचिन व्यास, सर्व नगरसेवक,शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.