देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:05 AM2017-12-26T01:05:05+5:302017-12-26T01:05:24+5:30

हिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्‍हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले.

Devalgaon Gardener women's cycling competition first! | देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम!

देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम!

Next
ठळक मुद्देवाशिम येथे पार पडली ब्रेवेट ३00 किलोमीटर स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्‍हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले.
मूळ फ्रांस या देशाची ब्रेवेट स्पर्धा असून, आता या ब्रेवेट स्पर्धेचे जाळे भारतभर पसरत आहे. भारतात ही स्पर्धा २0१0 पासून सुरू झाली आहे. वाशिम येथील रॉटीनियर्स ग्रुपने ही स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धा ही ३00 किलोमीटर अंतर २0 गावांमध्ये पूर्ण करावयाचे होते. सदर ब्रेवेट स्पर्धा वाशिमरून मालेगाव, शेलू, अमरावती, नागपूर, बायगाव राहाटगाव येथे १५0 किमी व परत त्याच मागील बायगाव राहटगाव येथे १५0 किमी व परत त्याच मार्गाने वाशिम असे एकूण ३00 किमी अंतर  होते. या स्पर्धेकरिता एकूण बारा जणांनी सहभाग नोंदविला होता. पैकी नऊ पुरुष व तीन महिला सहभागी होत्या. महिलांमध्ये सदर ३00 किलोमीटरचे अंतर देऊळगाव माळीच्या अलका गजानन गिर्‍हे यांनी कमी वेळात पार करून यश संपादन केले. अलका गिर्‍र्हे यामध्ये महाराष्ट्रातून पहिली महिला सायकलपटू आहे जिने हा बहुमान मिळविला. 
अलका या वाशिमचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले व माजी सभापती लताबाई इंगोले यांच्या कन्या असून, त्यांचा विवाह देऊळगाव माळी येथील जयरामजी गिर्‍र्हे यांचे सुपुत्र तथा विवेकानंद आश्रमचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन जयराम गिर्‍हे यांच्याशी झालेला आहे. अलका गिर्‍हे यांना लहानपासूनच सायकलींगची आवड होती. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. तसेच या स्पर्धेत त्यांनी महिला गटात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. या यशाचे o्रेय त्या कमलताई गिर्‍हे, डॉ.विजयकुमार गिर्‍हे, डॉ.प्राची गिर्‍हे, नारायण व्यास यांना देतात. 

Web Title: Devalgaon Gardener women's cycling competition first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.