ग्राम विकासामुळेच देशाचा विकास - प्रतापराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:09 PM2020-01-14T15:09:52+5:302020-01-14T15:09:56+5:30
नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आपला देश ग्रामीण भागांचा आहे. जोपर्यंत ग्रामविकास साधल्या जाणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होवू शकत नाही. त्यामुळे कामांचा दर्जा राखून नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.
जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १३ जानेवारी रोजी निवनिर्वाचित जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या पदग्रहन सभारंभात ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनिषाताई पवार, आ. संजय गायकवाड, जि. प. सभापती दिनकरराव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृ.उ.बा.समिती सभापती जालिंधर बुधवत, माजी जि. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, लक्ष्मणराव घुमरे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, मंगलताई रायपुरे, मनोज कायंदे, गट नेते आशिष रहाटे, माजी सभापती रियाज खॉन पठाण, जि. प. सदस्य शिल्पाताई शिंपणे यांचेसह जि. प. सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. खा. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेला तुटपूंजा निधी मिळतो. त्यातुन केलेल्या कामांचा दर्जा राखल्या जात नाही. रस्ते, नळयोजना, दवाखाने, शाळा इमारती याबाबत लोकांची मत जाणुन घेवुन काम करा कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. नव्या पदाधिकाºयांनी जलदगतीने ग्रामविकास साधण्यावर जोर द्यावा. यासाठी केंद्रीय ग्रामविकास समितीचा अध्यक्ष या नात्याने सकारात्मक स्वरुपात पाठीशी राहणार असल्याची ग्वाही खा. प्रतापराव जाधव यांनी दिली. महिला घर, कुटुंब चांगले सांभाळतात याच महिला जिल्हाही चांगला सांभळतील, असेही खा. प्रतापराव जाधव म्हणाले. प्रास्तविक शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.