सरपंचांना अधिकाराची जाणीव झाल्यास विकास हाेईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:32+5:302021-08-18T04:41:32+5:30
मेहकर: गावातील सरपंचांना आपले अधिकार व कर्तव्य समजले तर त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी चांगले काम होईल असे मत ...
मेहकर: गावातील सरपंचांना आपले अधिकार व कर्तव्य समजले तर त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी चांगले काम होईल असे मत खासदार तथा केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.
मेहकर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगारसेवक यांच्या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. १३ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, युवासेना जिल्हा अधिकारी ऋषी जाधव, सभापती नीता देशमुख, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपसभापती मीना म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे, तेजराव जाधव, मनिषा चनखोरे, पंचायत समिती सदस्य राजू घनवट, वर्षा सुरेश मवाळ, प्रतिमा वानखेडे, कैलास खंडारे, भूजंगराव म्हस्के, निंबाजी पांडव, सुपाजी पायघन, रेवती काळे उपस्थित होते. आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, आपल्या पदानुसार प्रत्येक व्यक्ती ने काम करावे. हे कळण्यासाठी ही कार्यशाळा आहे. आम्ही विकास निधी देतो. तशी कामेही व्हायला हवी. कामे खेचून आणण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी समन्वयाने प्रयत्न करायला हवा. गावाला काय पाहिजे, ते ओळखून कामे करा. ग्रामसेवकांनी गावाला कुटुंब समजून झोकून दिले पाहिजे. प्रास्ताविक माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, गटविकास अधिकारी आशिष पवार, उपविभागीय अभियंता दिनकर घुगे, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर जोशी, फुटाणे, शाखा अभियंता महाजन, परिहार, बोरकर, घनतोडे, मगर, कायंदे, रमेश ठाकरे यांची भाषणे झाली. संचालन शेषराव काटकर यांनी केले.