श्रध्दाभूमी ते प्रकटभूमी भाविकांची पायदळ वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 05:28 PM2018-12-30T17:28:57+5:302018-12-30T17:29:49+5:30

शेगाव- श्री गजानन महाराज मंदिर औरंगाबाद च्या 500 भाविकांनी श्रध्दाभूमी ते प्रकटभूमी पायदळ वारी केली.

Devotees from aurangabad come to shegaon | श्रध्दाभूमी ते प्रकटभूमी भाविकांची पायदळ वारी

श्रध्दाभूमी ते प्रकटभूमी भाविकांची पायदळ वारी

googlenewsNext


लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव- श्री गजानन महाराज मंदिर औरंगाबाद च्या 500 भाविकांनी श्रध्दाभूमी ते प्रकटभूमी पायदळ वारी केली.
 दिंडी सोबत ढोल , बासरी व झांज या पारंपारिक वाद्य आकर्षण होते. संतनगरी शेगाव या प्रकटभूमीत आज ही दिंडी दाखल झाली. टाळ, मृदंग, अभंग गायनासह दिंडीची अग्रभागी पारंपारिक वाद्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पारंपारिक वाद्य शहरवासी आवडीने ऐकतांना दिसून आले. 
औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिर अंतर्गत शेगाव पर्यंत  दरवर्षी  पायदळ वारी काढण्यात येते.यंदा ही वारी आज शेगावी श्रींचे प्रकटभुमीत पोहोचली. वारीतून आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Devotees from aurangabad come to shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.