रेल्वेचे तिकीटघर बंद असल्याने भाविकांना त्रास

By admin | Published: August 26, 2015 11:50 PM2015-08-26T23:50:00+5:302015-08-26T23:50:00+5:30

रविवारपासून रेल्वेचे तिकीटघर बंद.

The devotees suffer due to the closure of the railway ticket office | रेल्वेचे तिकीटघर बंद असल्याने भाविकांना त्रास

रेल्वेचे तिकीटघर बंद असल्याने भाविकांना त्रास

Next

शेगाव (जि. बुलडाणा) : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या संत नगरी शेगावला दररोज हजारो भाविक रेल्वेने येत असतात. परंतु याठिकाणी २३ ऑगस्ट संध्याकाळपासून जनरल रेल्वे टिकीट काउंटर बंद झाले आहे. भाविकांना त्रास सोसावा लागत आहे. शेगाव रेल्वेस्थानक अत्याधुनिक करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाकडून नुकतीच करण्यात आली. देशातील विविध राज्यामधून दररोज, येणार्‍या भाविक भक्तांना रेल्वे सुविधा पुर्ण स्वरुपात मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. मात्र, असे असतानाही २३ ऑगस्टच्या संध्याकाळपासून टी.एस.सर्व्हर बोर्डमध्ये बिघाड झाल्याने अचानक रेल्वे स्थानकावर असलेले तीन जनरल तिकीट बुकींग काउंटर, र्झिव्हेशन काउंटर व शहरात असलेले खासगी रेल्वे तिकीट काउंटर हे सर्व बंद पडले. बुधवार रोजी तीन दिवस उलटल्यावर यामधील केवळ तिकीट बुकींग काउंटर व रिझर्व्हेशन काउंटर चालु करण्यात आले. तर अद्यापही शहरातील तिकीट काउंटर व रेल्वे स्थानकावर असलेले एक तिकीट काउंटर पी.एन.आर. स्टेटस मशीन बंद आहे. २६ ऑगस्ट रोजी मोठी एकादशी असल्याने शहरात मोठय़ा प्रमाणवर भाविक आलेले आहेत. परंतु रेल्वे स्थानकावर तिकीटाकरिता रांगा लागलेल्या असल्याने रेल्वे निघेपर्यंतही तिकीट मिळणार की नाही अशी अवस् था त्याठिकाणी पाहावयास मिळते. याबाबत रेल्वेचे वाणिज्य प्रंबधक आर. एस. गोळे यांना विचारले असता काम प्रगथी पथावर आहे. लवकरच चालु करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The devotees suffer due to the closure of the railway ticket office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.