पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘निसर्गाची धमाल शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:26 PM2020-02-07T16:26:15+5:302020-02-07T16:26:21+5:30

या विशेष उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हेतर शाळेच्या संपर्कात आलेले अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत.

'Dhamma School of Nature' to protect the environment | पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘निसर्गाची धमाल शाळा’

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘निसर्गाची धमाल शाळा’

Next

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मृदा व जलसंधारणासोबतच पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी राज्यातील ४० तालुक्यातील अनेक शाळांमध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ घेण्यात येत आहे. पानी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हेतर शाळेच्या संपर्कात आलेले अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत.
२०१६-२०१९ या दरम्यान महाराष्ट्रातील हजारो गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात जल आणि मृदसंधारणाची कामे झालीत. त्याचे फलीतही यावर्षी पावसाळ््यात दिसून आले. फेब्रुवारी लागला तरी अजूनही जलस्त्रोतामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात पानी फाउंडेशनने पाणलोट विकासाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान अवगत असलेली एक मोठी फळी प्रशिक्षित केली. या फळीने महाराष्ट्रभरातील गावांना दुष्काळाविरोधात सुरू झालेल्या या जलचळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि सहकार्य केले. भूमीपूत्रांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांतून राज्यात ५५,००० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता तयार झाली आहे. केवळ पाणी आणि मृदा संधारणावर काम करून दुष्काळ संपणार नाही हे स्पष्ट झाल्याने ‘पानी फाउंडेशनच्या टिमने आता पर्यावरणाचा समतोल कसा राखल्या जाईल यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी राज्यातील ४० तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या अवर्षग्रस्त तालुक्यातील गावामध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यासोबतच ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व एनजीओ सहभागी होत आहेत.

 

Web Title: 'Dhamma School of Nature' to protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.