धनगर समाजाने आरक्षणासाठी फुकले रणशिंग; १३ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:22 PM2018-08-08T14:22:00+5:302018-08-08T14:23:36+5:30

बुलडाणा : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मंगळवारी बुलडाणा विश्रामगृह येथे सकल धनगर समाजबांधवातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती

Dhangar community gear up for reservation; Agitation On 13th August | धनगर समाजाने आरक्षणासाठी फुकले रणशिंग; १३ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

धनगर समाजाने आरक्षणासाठी फुकले रणशिंग; १३ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

Next
ठळक मुद्देशासनाने निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या मागणीसाठी एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन १३ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे.आश्वासन पाळावे आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

बुलडाणा : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मंगळवारी बुलडाणा विश्रामगृह येथे सकल धनगर समाजबांधवातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शासनाने निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण देऊन त्याची अमंलबजावणी करावी, या मागणीसाठी एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन १३ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या बैठकीला माजी आमदार नानाभाऊ कोकरे, डॉ.अलकागोडे, शरद वसतकार, चंदाताई बढें, पंचायत समिती सभापती संगीता पांढरे, सुनील मतकर, नामदेव बाजोडे, संजय पांढरे, उषा चाटे, महादेव बोरसे, रामभाऊ जुमडे, तेजराव बिबे, कडूबा गवारे, मनोज बोन्द्रे, शिवाजी औदंगे, गणेश नव्हळे, संतोष आटोळे, संदीप गायकवाड, प्रभाकर वरखेडे, सुनील गोरे,अशोक आटोळे, गजानन बोरकर, शिवलाल बोन्द्रे, विजय वसतकार, मनोहर पाचपोर, साहेबराव फासे, दिलीप गवारे, निलेश पोंधे, सनी पांढरे, जिल्ह्यातील सकल धनगर समाजबांधव सहभागी झाला होता. यावेळी यळकोट-येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा देण्यात आला. १३ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार याची खबदारी घ्यावी, याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बैठकीदरम्यान अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सध्याचे सरकार धनगर समाजाच्या मतांवर निवडून आले आहे. याची जाणही सरकारला आहे. त्यामुळे धनगर समाजाला निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळावे आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Dhangar community gear up for reservation; Agitation On 13th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.