खामगाव : बिडी ओढण्यास दिली नाही म्हणून चावा घेऊन कान तोडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:37 IST2018-01-31T01:26:32+5:302018-01-31T01:37:23+5:30
खामगाव : बिडी ओढण्यास दिली नाही म्हणून चावा घेऊन कान तोडल्याची घटना तालुक्यातील शहापूर येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

खामगाव : बिडी ओढण्यास दिली नाही म्हणून चावा घेऊन कान तोडला!
ठळक मुद्देखामगाव तालुक्यातील शहापूर येथील घटनासंबंधिताविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बिडी ओढण्यास दिली नाही म्हणून चावा घेऊन कान तोडल्याची घटना तालुक्यातील शहापूर येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गोपाल पांडुरंग भुसारी (वय ५५) यांना गावातीलच निरंजन आनंदा बोराडे याने बिडी मागितली. गोपाल भुसारी यांनी नकार दिल्याने त्याने शिवीगाळ करीत कानाला चावा घेतला. गोपाल भुसारी यांच्या कानाला मोठी दुखापत झाली असून, उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निरंजन बोराडे विरुद्ध कलम ३२५, ५0४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.