संत्र्याच्या पीक विम्यात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:22+5:302021-06-28T04:23:22+5:30
मेहकरात कमी दाबाने वीजपुरवठा मेहकर: शहरातील काही भागात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीजपुरवठा ...
मेहकरात कमी दाबाने वीजपुरवठा
मेहकर: शहरातील काही भागात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीजपुरवठा केला जात आहे. परिणामी, शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लगेच विद्युत पुरवठा खंडित होतो.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तिढा सुटेना!
बुलडाणा: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना यंदाही पीक कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीचा तिढा सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.
ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादनात घट
बुलडाणा : ग्रामीण परिसरात डेअरीच्या माध्यमातून हजारो लिटर दूध दररोज संकलन करून शहरात पाठविले जाते; मात्र चारा महागल्याने अनेकांनी आपल्याकडील म्हशी विकल्या आहेत. त्यामुळे दुग्ध उत्पादनात घट होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून योजनांची अंमलबजावणी होत नाही.
शहरातील मुख्य बाजारात स्वच्छतेचा अभाव
बुलडाणा : शहरातील मुख्य बाजारात सर्वत्र अस्वच्छता आहे. रस्त्याच्या मधूनच हातठेला व्यावसायिक फिरत असतात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
प्लास्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
हिवरा आश्रम : सर्वत्र प्लास्टिकचा जास्त वापर वाढल्याने शेतकऱ्यांची पाळीव जनावरे प्लास्टिक सेवन करीत आजारी पडत आहेत. प्लास्टिक पोटात गेल्याने यापूर्वी काही गुरांचा मृत्यूही झाला आहे. परिसरात व रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साचलेला राहत आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्याची कसरत
सिंदखेड राजा: पर्यटनात गेली दोन वर्षे कमालीची मंदी आहे. कोरोना महामारीचे सावट केव्हा दूर होईल हे सांगता येणारे नसले तरी पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यावसायिक तसेच उद्योजकांना सुरुवातीच्या तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
बाजार समितीमध्ये आवक घटली!
बुलडाणा: सध्या पेरणीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक चांगलीच घटली आहे. मागील वर्षी अनेक ठिकाणी जादा पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे उन्हाळ्यातही सोयाबीनची बाजार समितीमध्ये आवक कमीच आहे.
एसटी महामंडळाच्या कामगारांसमोर अडचणी
बुलडाणा: कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेली महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस.टी., त्यावर उपजीविका करणारे एस.टी.कामगार व त्यांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहेत. एस.टी.कामगारांचे वेतन लांबणे, नित्याचेच झाले आहे. एस. टी. बस सुरू झाल्या आहेत. यांत्रिकी विभागही सुरू असून, कार्यालय सुरू आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात १० पॉझिटिव्ह
देऊळगाव राजा: तालुक्यात रविवारी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही रुग्णसंख्या बघता प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेमध्ये नियमांचे उल्लंघन
बुलडाणा: जिल्हा परिषद कार्यालयात काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मुख्य प्रवेशद्वारावरच हात सॅनिटायइज करणे, मास्क अनिवार्य करणे आदी उपाय होत होते; मात्र आता नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.
सुविधांचा अभाव; रुग्णांचे हाल
सुलतानपूर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात विविध आजाराने डोके वर काढले आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणेची व्यवस्था कोलमडली आहे. सुविधांअभावी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होतात.
ग्रामस्थांना मास्कची ॲलर्जी!
दुसरबीड : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाविषयी नागरिकांमध्ये गांभीर्यच नसल्याचे चित्र दुसरबीड येथे दिसून येते. येथील बाजारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.