नव्या निर्बंधाने वाढल्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:46+5:302021-04-23T04:36:46+5:30

रामनवमी साधेपणाने साजरी डोणगाव : येथील गजानन महाराज मंदिरामध्ये दरवर्शी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; परंतु यावर्षी ...

Difficulties exacerbated by new restrictions | नव्या निर्बंधाने वाढल्या अडचणी

नव्या निर्बंधाने वाढल्या अडचणी

Next

रामनवमी साधेपणाने साजरी

डोणगाव : येथील गजानन महाराज मंदिरामध्ये दरवर्शी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; परंतु यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रामनवमी साधेपणाने साजरी करण्यात आली. दरवर्षीचे नियोजित कार्यक्रमही यंदा रद्द करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता.

लग्नासाठी केवळ दोन तासांचा अवधी

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नसमारंभ केवळ एकाच हॉलमध्ये आणि तेही दोन तासांमध्येच पूर्ण करावे लागणार आहेत. यासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

१०० कर्मचाऱ्यांची चाचणी

बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही पॉझिटिव्ह येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोरोना तपासणी शिबिर राबविण्यात आले.

बुलडाणा शहरात कचराकुंड्या वाढविण्याची गरज

बुलडाणा : शहरात नगरपालिकेच्या वतीने काही भागांत कचराकुंड्या लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आल्याने नगरपालिकेने कचराकुंड्या वाढविण्याची गरज आहे.

हळद पीक काढणी सुरू

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी वेगळा प्रयाेग म्हणून हळदीची लागवड केली आहे. सध्या हळदीचे पीक काढणी सुरू झाली आहे; परंतु मध्यंतरी हळद पिकावर करपा राेगाने आक्रमण केले होते. त्यामुळे हळद पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम या उत्पादनावर दिसून येत आहे.

जुनी पेन्शन याेजना सुरू करण्याची मागणी

डाेणगाव : राज्य शासनाने सुरू केलेली डीसीपीएस, एसपीएस पेन्शन याेजना तात्काळ बंद करून जुनी पेन्शन याेजना सुरू करण्याची मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. शासनाने १ नाेव्हेंबर २००५ पासून जुनी पेन्शन याेजना बंद करून नवीन याेजना सुरू केली आहे.

उन्हाळी हंगामासाठी पाणी साेडण्याची मागणी

किनगाव राजा : सततच्या पावसामुळे सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याची मागणी हाेत आहे. खरीप, रबी हंगामात पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता काही ठिकाणी उन्हाळी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

धाड : परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात परिसरात अनेक अपघात घडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे.

कृषी पंपांच्या वीज जाेडणीसाठी प्रतीक्षा

धामणगाव बढे : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपांच्या वीज जाेडणीसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र, काेटेशन भरूनही वीजजाेडणी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषी पंपाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते.

भाजीपाला पिकावर राेगराई

सुलतानपूर : लोणार तालुक्यात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाला पिकावर अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कोबी या पिकावरही रोगराई पसरलेली दिसून येते.

महिला बचत गट आर्थिक संकटात

बुलडाणा : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली; परंतु आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंराेजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना विक्रीची व्यवस्था नसल्याने संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

कृषी क्रांती योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहणार

बीबी : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. विविध कारणांनी अनेक शेतकऱ्यांना या याेजनेसाठी अर्ज करता आलेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष लाभापासून शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही.

Web Title: Difficulties exacerbated by new restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.