ई-पीक पाहणीत शेतकऱ्यांना अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:36+5:302021-09-14T04:40:36+5:30
सर्वच शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राईड मोबाइल नाही. अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहीती नाही, निरक्षर व असंघटित शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, क्वचित शेतकऱ्यांकडे ...
सर्वच शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राईड मोबाइल नाही. अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहीती नाही, निरक्षर व असंघटित शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, क्वचित शेतकऱ्यांकडे मोबाइल आहेत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्या ॲपची माहिती नाही, साईट चालत नाही, ओटीपी येत नाही, पोटखराब क्षेत्राची नोंद कशी करावी, झाडांची नोंद कशी करावी हे माहिती नाही. शेतात नेटवर्क नाही, अशा नानाविध कारणांमुळे शेतकरी विमा, शासकीय अनुदान, शासनाच्या योजनापासून वंचित राहू शकतात. त्यासाठी शासनाने त्याच्या प्रतिनिधींकडून तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी करून पिकांच्या नोंदी कराव्यात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर कराव्यात, अशी मागणी माजी सरपंच केशव सरकटे, दिनकर जायभाये, संजय अंभोरे, मनोहर सरकटे यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.