फळा-खडूऐवजी डिजीटल फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 10:56 PM2017-09-07T22:56:07+5:302017-09-07T22:56:59+5:30
सावंगीमाळी येथील गावकर्यांच्या सहकार्यामुळे दोन शिक्षकांनी गावच्या माळरानावर शाळे त नंदनवन फुलवून शाळा डिजिटल केली. सावंगीमाळी येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजिटल झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षण आनंदीदायी वाटत आहे.
ओमप्रकाश देवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम : सावंगीमाळी येथील गावकर्यांच्या सहकार्यामुळे दोन शिक्षकांनी गावच्या माळरानावर शाळे त नंदनवन फुलवून शाळा डिजिटल केली. सावंगीमाळी येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजिटल झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षण आनंदीदायी वाटत आहे.
मेहकर तालुक्यातील सावंगीमाळी हे गाव ७२१ लोकसं ख्येचे आहे. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची स्थापना १९७९ ला झालेली आहे. या शाळेत दोन शिक्षक असून, मुख्याध्यापकपदी केशव दगडू राजगुरू, सहायक अध्यापक मनीषा विठ्ठल भराड कार्यरत आहेत. शाळेच्या विकासाकरीता गावकरी व शिक्षकांनी नोकरीवर असलेल्या तरुणांचा सत्कार समारंभ व प्रेरणा सभा आयोजित केली. या सभेमध्ये उच्चशिक्षित तरुण व नोकरीला असणारे तरुण यांना या दोन्ही शिक्षकांनी शाळेविषयी विकासात्मक सर्व बाबी समजावून सांगितल्या. गावकर्यांनी याला दुजोरा देत युवा पिढी समोर येऊन एकाच वेळेस सुमारे १ लाख १0 हजार रुपये लोकवर्गणी जमा करून शाळेमध्ये रंगरंगोटी, दुरुस् ती, विद्युत कनेक्शन, इलेक्ट्रिक फिटिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळेसमोरील मैदानाचे सपाटीकरण यासारख्या छोट्या-छोट्या अनेक बाबी यांनी राबविल्या. सावंगीमाळी येथील ग्रामपंचायतने पुढे येऊन दोन एलईडी संच शाळेला भेट दिले. त्यामुळे आता दोन्ही शिक्षक सर्व अभ्यासक्रम हा एलईडीवरच शिकवित आहेत.
खासगी शाळेतील विद्यार्थी जि.प. शाळेत
या दोन्ही शिक्षकांचे काम व शाळेची प्रगती पाहून खासगी शाळेतील प्रवेश रद्द करून येथील पालकांनी आपली मुले याच जि.प. शाळेत प्रवेशासाठी पाठविली. या शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांचे मार्गदर्शन, गावकरी, ग्रामपंचायत प्रशासन व शाळा समितीचे सर्व सदस्य यांचे सहकार्य मिळत आहे.