शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:36 PM2020-06-17T12:36:34+5:302020-06-17T12:36:46+5:30

महसूल विभागाने डिजीटल स्वक्षरीचा सातबारा आॅनलाइन उपलब्ध केलेला आहे.

digital signatures Satbara at home for farmers! | शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा!

शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणी कामात व्यस्तत आहेत. परंतू पीक कर्जासह विविध कामासाठी लागणाºया सातबाराकरीता आता शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज पडणार नाही. महसूल विभागाने डिजीटल स्वक्षरीचा सातबारा आॅनलाइन उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे शेतकºयांना घरबसल्या हा सातबारा मिळविता येणार आहे.
शेतकºयांना विविध कामासाठी सातबारा आवश्यक आहे. सध्या पीक कर्ज काढण्याची गडबग आणि पेरणीची तयारीत शेतकरी आहेत. परंतू त्यासाठी सातबारा काढण्याकरीता शेतकºयांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. आता सातबारा मिळविण्यासाठी कुठेही जायची गरज नसून शेतकरी घरबसल्या सातबारा प्राप्त करू शकतात. सात बारा प्राप्त करण्यासाठी शासनाच्या या संकेतस्थळावर गेल्यानंतर डिजीटल स्वाक्षरीत सातबारा व मालमत्ता पत्रक या लिंकवर क्लिक करून तो मिळविता येतो.
कोणत्याही खातेदाराला पहिल्यांदा गेल्यास या वर नोंदणी करावी लागते. त्यासाठी ‘न्यू युसर रजीस्ट्रेशन’ या लिंकवर क्लिक करून एकदा खाते उघडावे लागते. हे करताना आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी, जन्मतारिख आदी माहिती देवून नाव नोंदणी करता येते. यावेळी दिलेले युजरनेम व पासवर्ड जपून लहून ठेवणे आश्यक आहे. खाते तयार करताना पासवर्ड स्ट्राँग असण्यासाठी त्यामध्ये आठ अंक, त्यापैकी एक कॅपीटल लेटर व एक स्पेशल कॅरॅक्टर असावे लागते. आपल्या खात्यावर गरजेप्रमाणे आॅनलाइन डिजीटल पेमेंटद्वारे पैसे भरून खाते रिचार्जही करता येते.


आॅनलाइन शुल्क
शेतकºयांना डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा घेतल्यानंतर त्यासाठी त्यांना आॅनलाइन शुल्क भरण्याची व्यवस्था आहे. यासाठी स्टेट बँकेचे पेमेंट गेटवे मधून नेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड वापरून पैसे भरता येतात. खात्यावरून जेवढे डिजीटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड केले जातील त्याचे प्रती प्रत १५ रूपये प्रमाणे पैसे खात्यावरून कमी होतात.


९७.५ टक्के सातबारा डिजीटल
शासनाच्या संकेतस्थळावरून जिल्हा, तालुका व गाव निवडून तसेच सर्व्हे नंबर निवडून कोणताही सातबारा काढता येऊ शकतो. आपले हे खाते वापरून आपल्याला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही खातेदाराचा कोणताही डिजीटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करता येतो. राज्यातील ९७.५ टक्के सातबारा डिजीटल स्वाक्षरीत झाले असून शेतकºयांना घरी बसून आपले मोबाईलवर अथवा संगणकावर हा सातबारा प्राप्त करून घेता येणे सोईचे झाले आहे.

Web Title: digital signatures Satbara at home for farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.