नाबार्ड व जिल्हा बँकेकडून डिजिटल सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:40+5:302021-07-07T04:42:40+5:30

कीड नियंत्रणावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन दुसरबीड : परिसरात सोयाबीन पीक चांगले बहरलेले आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन ...

Digital Week from NABARD and District Bank | नाबार्ड व जिल्हा बँकेकडून डिजिटल सप्ताह

नाबार्ड व जिल्हा बँकेकडून डिजिटल सप्ताह

Next

कीड नियंत्रणावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दुसरबीड : परिसरात सोयाबीन पीक चांगले बहरलेले आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काच्या वापराबाबत शेतकऱ्यांना धडे देण्यात आले.

तणनाशकामुळे सोयाबीन जळण्याचे प्रमाण वाढले!

मोताळा : बोगस तणनाशकाची फवारणी केल्याने सोयाबीन पीक जळण्याच्या घटना वाढल्या आहेत. सध्या सोयाबीन पिकाची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे. त्यात तणाचीदेखील वाढ जोमात होती; परंतु आंतरमशागतीसाठी शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत.

रस्ता गेला खड्ड्यात; वाहनचालक त्रस्त

सिंदखेडराजा: ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे. रस्त्याचे डांबरीकरण काम होऊन एक ते दोन वर्षे पूर्ण होत नाही, तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येते.

बियाणे न उगवल्याने शेतकरी अडचणीत

देऊळगाव राजा : बोगस बियाणे निघाल्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सतत तीन वर्षांपासून दुष्काळ तर अतिवृष्टी आणि यावर्षी कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल भावाने विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

Web Title: Digital Week from NABARD and District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.