थेट निवडणुकीमुळे सरपंच पदासाठी चुरस वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:39 AM2017-09-04T00:39:52+5:302017-09-04T00:40:15+5:30

सिंदखेडराजा: तालुक्यातील ८0 पैकी ३0 ग्रामपंचायतींची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रथमच थेट मतदारातून सरपंच निवडल्या जाणार असल्याने  निवडणुकीत रंगत येणार आहे.

Direct election has increased for the post of Sarpanch! | थेट निवडणुकीमुळे सरपंच पदासाठी चुरस वाढली!

थेट निवडणुकीमुळे सरपंच पदासाठी चुरस वाढली!

Next
ठळक मुद्देसिंदखेडराजा तालुक्यात ३0 ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: तालुक्यातील ८0 पैकी ३0 ग्रामपंचायतींची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रथमच थेट मतदारातून सरपंच निवडल्या जाणार असल्याने  निवडणुकीत रंगत येणार आहे.
या निवडणुकीतील ग्रामपंचायतींसाठीची आचारसंहिता  १ सप्टेंबर रोजी दुपारी  ४ वाजेपासून लागू करण्यात आली आहे.  निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र ऑनलाइन दाखल करावे लागणार आहे. तर सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे. तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या ८0 असून, त्यापैकी ३0 ग्रामपंचायतींची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यामध्ये जांभोरा, सावरगाव माळ, वर्दडी बु; अंचली, आडगावराजा, शिवणी टाका, झोटिंगा, गुंज, बाळसमुद्र, पिंपळगाव सोनारा, शिंदी, राताळी, सावखेड तेजन, सोयंदेव, धानोरा, खैरव, वाघाळा, केशवशिवणी, ताडशिवणी, चांगेफळ, रुम्हणा, जऊळका, पिंपळगाव कुडा, देवखेड, तढेगाव, साठेगाव, वाघजाई, उमरद, हिवरखेड पूर्णा व निमगाव वायाळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी अधिसूचना येत्या गुरुवारी  ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र ऑनलाइन दाखल करण्याची मुदत १५  ते २२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ वाजता ते ४.३0 वाजतापर्यंत आहे. 
दरम्यान, यामध्ये १७ सप्टेंबर रविवार व  २१ सप्टेंबर, गुरुवारी सुटी असल्याने नामनिर्देशन दाखल करता येणार नाही. नामनिर्देशन अर्जांची छाननी २५ सप्टेंबर, सोमवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. २७ सप्टेंबर, बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील व त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ७ ऑक्टोबर, शनिवारी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. ९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 
सदर निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सारिका भगत, प्रशांत वाघ आदींसह प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.   

Web Title: Direct election has increased for the post of Sarpanch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.