लसीकरणात दिव्यांगांना प्राधान्य मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:20+5:302021-06-19T04:23:20+5:30
मेहकर: काेराेना लसीकरणात दिव्यांगाना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन मेहकरचे तसीलदार डाॅ.संजय गरकल यांनी दिले. दिव्यांग लस ...
मेहकर: काेराेना लसीकरणात दिव्यांगाना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन मेहकरचे तसीलदार डाॅ.संजय गरकल यांनी दिले. दिव्यांग लस अभियानाचे मेहकर तालुक समन्वय अधिकारी प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी लसीकरणाविषयी तहसीलदारांबराेबर चर्चा केली.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे सद्या वय वर्षे ४५ वरील नागरिकांना लस देणे सुरू आहे. सर्व लसीकरण केंद्र, ग्रामीण रुग्णालय संबंधितांना लस देताना दिव्यांग व्यक्तीस प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येतील. गाव, शहर भागात कार्यरत कर्मचारी शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, मदतनीस व आरोग्य विभागाचे डॉकटर, नर्स, कर्मचारी यांनी केंद्रावर दिव्यांग व्यक्तीस लसीकरण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात येतील. ज्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती संख्या अधिक असेल, तेथे शिबिर घेण्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या जाईल, असे तहसीलदार डॉ.संजय गरकल म्हणाले. लसीकरणाबाबत पत्र प्राचार्य शेळके यांनी तहसीलदार यांना देऊन चर्चा केली. जिल्हा नोडल ऑफिसर मनोज मेरत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी हिवरा आश्रम येथील प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांची मेहकर व लोणार तालुका समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्राचार्य शेळके यांनी १५ जून रोजी मेहकर येथे नगरपालिका दिव्यांग विभागाचे प्रमुख पवन भादुपोता यांचेशी संपर्क करून, मेहकर शहर दिव्यांग व्यक्ती लसीकरण सक्षमतेने करण्याबाबत सांगितले.