प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांची गैरसोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:42 PM2018-05-10T17:42:49+5:302018-05-10T17:42:49+5:30

देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही.

Disadvantages of the citizens due to the lack of passenger shelter | प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांची गैरसोय 

प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांची गैरसोय 

Next
ठळक मुद्दे. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ४० खेडे देऊळगावमहीशी जोडलेले आहेत. येथे प्रवासी निवारा व्हावा यासाठी पाहिजे तसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही.

देऊळगावमही : परिसरातील जवळपास ४० खेडे जोडलेल्या देऊळगावमही येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हात उभे राहून बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहलेला नाही. साधारण दीड महिन्याआधी ग्रांमचायतीने प्रवासी निवाºयासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या ८२ आर जागेचा ठराव मंजूर केला होता. परंतू अद्यापही यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. देऊळगावमही येथे १९९९ मध्ये रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे येथील प्रवासी निवारा उध्वस्त करण्यात आला. तेंव्हापासून आजपर्यंत येथे प्रवासी निवारा नाही. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ४० खेडे देऊळगावमहीशी जोडलेले आहेत. येथून हजारोंच्या संख्येने लोक प्रवास करतात. येथून इंदौर, सुरत, नागपूर, अमरावती, अकोला ,यवतमाळ, खामगाव, बुलडाणा, मलकापूर, जळगाव खान्देश, शेगाव, जालना ,औरंगाबाद, कोल्हापूर , सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर , शिर्डी , लातूर , पंढरपूर, तुळजापूर, पैठण, बीड, उस्मानाबाद, हैद्राबाद, म्हैसूर, कोकण, गोवासाठी प्रवासी जातात. मात्र येथे प्रवाशांना कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. येथून जखमी किंवा आजारी रुग्णाला उपचारासाठी जालना, औरंगाबाद ,बुलडाणा, चिखली जावे लागते. प्रवासी निवारा नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. देऊळगावमहीतील पुढाºयांमध्ये याबाबत उदासिनता दिसून येते. येथे प्रवासी निवारा व्हावा यासाठी पाहिजे तसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. काही दिवसांपुर्वी भाजपचे शहराध्यक्ष कैलास राऊत यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना यासंदर्भात निवेदन दिले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही निवेदन देण्यात आले. परंतू कुठलीच कारवाई झाली नाही.

सामूहिक पाठपुरावा आवश्यक

सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी प्रवासी निवाºयासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र ग्रांमचायत व गावकºयांच्या सहकार्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. ग्रांमचायतीने त्यासाठी लागणारी कागदपत्रे पुर्ण करुन आमदार खेडेकर यांच्याकडे देणे गरजेचे आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. स्थानिक राजकारण बाजूला ठेवून सामूहिक पाठपुरावा करणे आवश्यक आहे. देऊळगावमही येथे प्रवासी निवारा कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Disadvantages of the citizens due to the lack of passenger shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.