मोफत प्रवेशापासून विद्यार्थी वंचित!

By admin | Published: June 27, 2017 09:29 AM2017-06-27T09:29:26+5:302017-06-27T09:29:26+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ३३ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी!

Disadvantages of students from free admission! | मोफत प्रवेशापासून विद्यार्थी वंचित!

मोफत प्रवेशापासून विद्यार्थी वंचित!

Next

ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आरटीई अंतर्गत पश्चिम विदर्भात १० हजार ८०६ जागांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे; परंतु अद्याप पश्चिम विदर्भात ७ हजार २३९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश घेण्यात आले आहेत. २७ जूनला शाळा सुरू होत असून, शाळा सुरू होण्याच्या एकदिवस अगोदरपर्यंत ३ हजार ५६७ विद्यार्थ्यांचा प्रवेश बाकीच आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ३३ टक्के विद्यार्थी मोफत प्रवेशापासून वंचित आहेत.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टू एज्युकेशन म्हणजेच आरटीई) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून देण्यात आले आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाकडून १६ जानेवारीपासूनच आॅनलाइन सुरू करण्यात आली होती; परंतु २७ जूनला शाळा सुरू होत असताना अद्याप आर.टी.ई. अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. फेब्रुवारी महिन्यात पालकांना अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून १० हजार ८०६ जागांसाठी १५ हजार ५६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून जिल्हा स्तरावर ह्यड्रॉह्ण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला. काही जिल्ह्यात दोन वेळेस तर काही ठिकाणी चार ते पाच वेळेस मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे ह्यड्रॉह्ण काढण्यात आले; मात्र २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध अडचणी येत असल्याने व शाळांचासुद्धा या प्रक्रियेसाठी उत्साह दिसत नसल्याने अनेक प्रवेश अद्यापही बाकी आहेत. मोफत प्रवेशासाठी अमरावती विभागातून १० हजार ८०६ जागांपैकी केवळ ६७ टक्के म्हणजे ७ हजार २३९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश घेण्यात आले आहेत. उर्वरित ३ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे अद्यापही बाकीच आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून २ हजार ८८५ जागेपैकी १ हजार ४२० विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातून २ हजार ३८२ जागेपैकी १ हजार ७८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात आले. अमरावती जिल्ह्यात २ हजार ९२० जागेपैकी २ हजार १६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात आले. वाशिम जिल्ह्यात ९०८ जागेपैकी ५४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.
यवतमाळ जिल्ह्यात १ हजार ७४१ अर्जापैकी १ हजार ३१७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. २७ जूनला शाळा सुरू होणार असून, अद्यापही पश्चिम विदर्भातील ३ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे बाकी असल्याने या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून वंचित राहवे लागणार असल्याचे दिसून येते.


राज्यातील ६०,१६० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
राज्यातील ८ हजार २७९ शाळांमध्ये १ लाख २० हजार ५४८ जागांसाठी आर.टी.ई.अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतून मोफत प्रवेश घेण्यासाठी १ लाख ४७ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत; परंतु १ लाख २० हजार ५४८ जागा असून, त्यापैकी ६० हजार ३८८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे; मात्र अद्यापही राज्यातील ६० हजार १६० विद्यार्थी गेल्या पाच महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

३३ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी
४अमरावती विभागात २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये १० हजार ८०६ जागेपैकी ३ हजार ५६७ म्हणजे ३३ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४३५, अकोला जिल्ह्यात ५९३, अमरावती जिल्ह्यात ७५५, वाशिम जिल्ह्यात ३६० व यवतमाळ जिल्ह्यात ४२४ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.

आजपासून जिल्ह्यातील शाळांना सुरुवात
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिकच्या सर्व माध्यमांच्या शाळांना २७ जूनपासून सुरूवात होणार आहे. यावेळी शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे शिक्षण विभागाकडून आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Disadvantages of students from free admission!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.