वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:17 AM2017-08-09T00:17:48+5:302017-08-09T00:18:29+5:30
नांदुरा : तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला असून हे केंद्र रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते. या आरोग्य केंद्रावर वडनेर, चांदुरसह ३0 खेड्यातील जवळपास ५0 ते ६0 हजार लोकसंख्या आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहे. पण जवळपास एक महिन्यापासून येथे आरोग्य अधिकारी नसून सहाय्यक डॉक्टरांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. तसेच १0 दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेत डिझेल नसल्याने ते उभे आहे. हा सर्व प्रकार पंचायत समिती सदस्य योगिता गावंडे यांनी उघडकीस आणला असून डॉक्टर नसेपर्यंत तेथून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सेवेचे धिंडवडे पुन्हा निघाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी २0 दिवसांपासून सुटीवर असून त्यांच्या जागी तालुका आरोग्य अधिकारी खंडारे यांनी तीन आयुर्वेदीक डॉक्टरकडे पदभार दिला असून प्रत्येकी २ दिवस त्यांची पाळी नेमली आहे. परंतु अँलोपॅथी डॉक्टरच नसल्याने रूग्णांवर उपचार होत नाहीत. तसेच डिलीव्हरी पेशंट, सर्पदंश, विष प्राशनच्या घटनेतील पेशंटवर इलाज करणारे डॉक्टर नसल्याने त्यांना मलकापूर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यासाठी असलेल्या रूग्णवाहीकेतही १0 दिवसांपासून डिझेल नाही. चार अटेंडंटची नियुक्तीपैकी एकही हजर नसल्याने स्वत: पंचायत समिती सदस्य योगिता गावंडे यांनी त्यांची कामे केली. तसेच सफाई नसल्याने स्वत: साफसफाई केली असून रूग्णवाहीकेत स्वत: खर्च करून डिझेल भरले आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने गावंडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांना वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधेबाबत माहिती दिली असता त्यांनी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. वडनेर येथे एकूण ४६ पदे मंजूर असून सध्या केवळ १५ ते १६ कर्मचारीच कार्यरत आहेत. काहींची बदली झाली तर काही ट्रेनिंगसाठी गेले आहे. डिघी व वडनेर येथील उपकेंद्रावरील कार्यरत आरोग्य सेवकांना संपर्क केला असता कोणी गाडी पंक्चर झाल्याचे तर कोणी पत्नीला गावी सोडायला जात असल्याचे कारण सांगितले. आरोग्य अधिकारी नसल्याने सदर केंद्रात कोणताही ताळमेळ नाही.
आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त
सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६ पदे रिक्त असताना केवळ १५ ते १६ पदे रिक्त आहेत. त्यात आरोग्य अधिकारीच गैरहजर असल्याने कार्यरत कर्मचार्यांवर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेची परिस्थिती अ ितशय गंभीर असून आयुर्वेदीक डॉक्टरांच्या भरवशावर कारभार सुरु आहे. आरोग्य अधिकारी नसल्याने डिलीव्हरी पेशंट, सर्पदंश सारखे पेशंट मलकापूरला पाठवावे लागतात. पण त्याकरीता येथील रूग्णवाहीकेत १0 दिवसापासून डिझेलही नाही. आपण स्वखर्चातून डिझेल भरून दिले असून जोपर्यंत येथील आरोग्य सुविधा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत इथेच स्वत: काम करणार आहे.
- योगिता गावंडे, पंचायत समिती सदस्य नांदुरा.