आपत्तीव्यवस्थापनाची बारा वाहने बंद
By admin | Published: June 29, 2017 07:35 PM2017-06-29T19:35:58+5:302017-06-29T19:35:58+5:30
जिल्हास्तरावर १८ शासकीय वाहनांचे नियोजन केले बुलडाणा : असताना त्यापैकी केवळ ६ वाहनेच चालू अवस्थेत असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पावसाळ्यात उद्धभवणारी नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता, त्याच्याशी दोन हात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थान विभाग सज्ज आहे. या आपत्ती दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर १८ शासकीय वाहनांचे नियोजन केले असताना त्यापैकी केवळ ६ वाहनेच चालू अवस्थेत असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाला खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागणार आहे.
वादळी पाऊस, वीज, नदीनाल्यांना आलेले पूर यामुळे बऱ्याच वेळा नागरिकांवर नैसर्गिक संकट ओढावते. या संकटापासून सुरक्षा, बचाव, उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याचा नैसर्गिक आपत्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार शासकीय कर्मचारी व स्वयंसेवी संघटनेच्या सदस्य व गरिकांवर आपत्तीने प्रभावित नागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी देण्यात आली आहे. याकामी शासकीय वाहनेही लावण्यात आली आहे. आपत्ती काळात व आपत्तीनंतर परिस्थिती कशी हाताळावी यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आपत्तीग्रस्त भागात रस्ते मोकळे करणे, जाण्यायेण्यासाठी मार्ग सुरक्षित करणे, पडलेली झाडे आदी कामासाठी प्रशासनाकडून वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र नियोजित १८ शासकीय वाहनांपैकी १२ बंद असवस्थेत असून केवळ ६ वाहन चालू आहे. अश्या परिस्थित प्रशासनाला खाजगी वाहनांची मदत द्यावी लागणार आहे.
अशी आहे वाहनांची स्थिती
नैसर्गिक आपत्ती आराखड्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकूण १८ शासकीय वाहनांची नोंद आहे. त्यात ७ रोलर, १ टिप्पर, १ ट्रैक्टर, ४ ट्रक, १ कार, ४ जीप अश्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे. मात्र त्यापैकी २ ट्रक व ४ जीप चालु अवस्थेत असून इतर बारा वाहन बंद आहे.