आपत्ती व्यवस्थापन चमू आदर्शवत कार्य करेल!

By admin | Published: September 20, 2015 11:39 PM2015-09-20T23:39:51+5:302015-09-20T23:39:51+5:30

चिखलीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात राहुल बोंद्रे यांची माहिती.

Disaster Management Team will ideally work! | आपत्ती व्यवस्थापन चमू आदर्शवत कार्य करेल!

आपत्ती व्यवस्थापन चमू आदर्शवत कार्य करेल!

Next

चिखली (जि. बुलडाणा) : अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने त्यांच्या विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने आपत्कालीन परिस्थितीत संकटात सापडणार्‍या बांधवांची सुखरूप सुटका करता यावी, याकरिता अँडव्हेंचर क्लबच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून सुरू केलेला डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ही आपत्ती व्यवस्थापन चमू आदर्शवत कार्य करेल, असा विश्‍वास आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला. स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात आमदार बोंद्रे बोलत होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी निर्मित विविध कलाकृतींच्या आर्ट गॅलरीचे उद्घाटनदेखील बोंद्रे यांच्या हस्ते पार पडले. मनोरंजनासोबच समाजसेवेची ओढ विद्यार्थिदशेतच लागावी, याकरिता आमच्या महाविद्यालयातर्फे साजरा होणार्‍या प्रत्येक महोत्सवामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम रावबून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. नदी खोलीकरण व रुंदीकरण, आपत्ती व्यवस्थापन चमूची निर्मिती करून त्यांना निरंतर प्रशिक्षण, एनएसएसमार्फत दत्तकग्राम योजना आदी उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांना सामाजिक बांधीलकीची जाणीव करून दिली जाते. त्याचप्रमाणे गो ग्रीनसारख्या संकल्पनेच्या माध्यमातून निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची ओळख करून दिली जाते. या दोन्हीही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून आमचे महाविद्यालय राबवीत आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.. अरुण नन्हई यांनी याप्रसंगी दिली. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात महाविद्यालयाच्या ११८ विद्यार्थ्यांंनी सहभाग नोंदविला.

Web Title: Disaster Management Team will ideally work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.