खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 11:09 AM2020-08-03T11:09:47+5:302020-08-03T11:10:11+5:30
विसर्ग आता कमी करण्यात आला असून तो सध्या ३,८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यात उगम पावणाऱ्या व बुलडाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यांची जीवन वाहिनी असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून गेल्या नऊ दिवसापासून पाण्याचा विसर्ग सध्या सुरूच असून रविवारी सकाळी १९ वक्रद्वारातून ३७ हजार क्युसेक वेगाने सोडण्यात येणाºया पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला असून तो सध्या ३,८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
दुपारी दोन वाजता प्रकल्पात होणाºया पाण्याची आवक कमी झाल्याने १४ दरवाजे बंद करण्यात येवून पाच दरवाजातून तीन हजार ८०८ क्युसेक वेगाने (१०८ क्युमेक) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या नऊ दिवसापासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून आतापर्यंत जवळपास ७० दलघमी पाणी खडकपूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
खडकपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याची पातळी ही ९३ दलघमीच्या आसपास असते. यावरून प्रकल्पातून किती मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले, याची कल्पना यावी.