रेल्वेमार्ग सर्वेक्षण समितीशी पालकमंत्र्यांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:06+5:302021-01-08T05:52:06+5:30
सोबतच बाजारपेठ, औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व पटवून देत रेल्वे मार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, ...
सोबतच बाजारपेठ, औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व पटवून देत रेल्वे मार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव या चार तालुक्यांमधून हा रेल्वे मार्ग जात आहे. या भागातील कृषी व व्यापारी बाजारपेठेचे महत्त्व मोठे आहे. कृषी, व्यापार व औद्योगिक विकासासोबतच या भागातील रेल्वेमार्ग हा रोजगाराची गरज आहे. या भागापासून मुंबई- नागपूरसारखी औद्योगिक शहरे दूर असल्याकारणाने या भागातील उद्योजक, व्यापारी यांना दळणवळण व वाहतूक खर्च जास्त येतो. त्यानुषंगाने येथील विकासासाठी हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा असल्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले. यासोबतच जिल्ह्यातील पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीनेही रेल्वेमार्ग महत्त्वाचा आहे. लोणार, सिंदखेड राजा, शेगावचे संदर्भही त्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रारंभी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी व जिल्हाधिकारी यांच्यांशी संपर्क साधून सर्वेक्षण समितीस संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.