मुद्दे पे चर्चा : उद्योगांना पुनर्रुज्जीवीत करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:59 PM2019-04-09T13:59:38+5:302019-04-09T13:59:44+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्हयात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमआयडीसी सुरु करण्यात आली. मात्र एमआयडीसीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
- योगेश फरपट
खामगाव: बुलडाणा जिल्हयात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमआयडीसी सुरु करण्यात आली. मात्र एमआयडीसीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक उद्योग बंद पडले आहेत.
सुशिक्षित बेरोजगार होण्याचे प्रमाण वाढत असताना काही तरुण मंडळी उद्योजकाकडे उद्योगाकडे वाढताना दिसते. परंतु प्रशासनाकडून त्यांना सहकार्य होत नसल्याने नवीन उद्योग सुरू करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी जात आहेत.
सर्व ठिकाणचा भ्रष्टाचार कमी झाला असेल परंतु एमआयडीसीमधील भ्रष्टाचार मात्र अजूनही कमी झालेला नाही. म्हणून काही अधिकारी वगळता आणि काही कर्मचारी वगळता बहुतांशी प्रमाणात भ्रष्टाचार अजूनही सुरूच आहे. त्यामुळे उद्योजक त्रस्त झालेले आहेत त्या सर्व बाबींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे मूलभूत सुविधा देणे तर दूरच परंतु आहेत त्या सुविधा सुद्धा रेगुलर मिळत नाहीत खामगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा जानेवारीपासून बंद करण्यात आला आहे. आजूबाजूच्या विहिरी अधिग्रहित करण्याचे काम प्रशासनाने करायला हवे होते. परंतु तसे ते दिसत नाही. त्यामुळे निर्ढावलेले प्रशासन आणि रााजकीय इच्छाशक्ती त्यामुळे खामगावातील उद्योजक तरी सध्या अडचणीत सापडले आहेत. एमआयडीसी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करुनही अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. शिवाय जिल्हा प्रशासनाकडूनही एमआयडीसीमध्ये सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. एमआयडीसीतील उद्योग बंद पडल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
एमआयडीसी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. वरिष्ठ पातळीवर तक्रारी सुद्धा केल्या परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही. उद्योजकांना सहकार्य तर सोडा परंतु जबरदस्ती त्रास देण्याचा प्रयत्न होतो. या सर्व प्रकाराने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा प्रकार थांबायला पाहिजे.
- सतीष राठी,
सचिव, आॅईल, मिल असोसिएशन
एमआयडीसी प्रशासनामार्फत उद्योजकांना पाहिजे त्या सोयी उपलब्ध होत नसल्याने येथील उद्योगांचा विस्तार पाहिजे त्या प्रमाणात वाढलेला नाही पाणी जर मुबलक असेल तर उद्योजक अनेक उद्योग येथे सुरू करू शकतात परंतु पाण्याची कमतरता आणि त्याच्याकडे असलेले प्रशासन आणि राजकीय दुर्लक्ष त्यामुळे खामगाव एमआयडीसी व होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
- अजय शेळके, उद्योजक