मोदींच्या पराभवाची चर्चा चहाच्या टपरीवरून होईल : शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 05:27 PM2018-05-06T17:27:22+5:302018-05-06T17:27:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील

Discussion of Modi's defeat will be on top of tea: Shetty | मोदींच्या पराभवाची चर्चा चहाच्या टपरीवरून होईल : शेट्टी

मोदींच्या पराभवाची चर्चा चहाच्या टपरीवरून होईल : शेट्टी

देऊळगाव मही (जि. बुलडाणा) : ज्यांनी चहाचं भांडवल करून जनसामान्यांना फसवले तीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील, अस भाकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी देऊळगाव मही येथे केले. स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी म्हणवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलावण्याची आमची मागणी मान्य करावी
असे सांगत शेतकर्यांनी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निकराने लढा द्यावा. २०१९ ची निवडणूक जात-धर्मावर लढणार्या हिसका दाखवा, असे आवाहनही खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना केले.

महाराष्ट्र दिनापासून धुळे जिल्ह्यातील वखरण येथून ही ‘शेतकरी सन्मान यात्रा’ सुरू झाली असून पाच मे रोजी रात्री ती देऊळगाव मही येथे पोहोचली
होती.  त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, कवी ज्ञानेश वाकुडकर,
युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगूले, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, घनशाम चौधरी, माणिकराव कदम, गजानन बंगाळे पाटील, राज्य उपाध्यक्ष सयाजी
मोरे, अमोल हिप्परगे, अनिल पवार, राज्य उपाध्यक्षा शर्मीला येवले, बबनराव चेके यांच्यासह अन्य उपस्थित होते.

ही लढाई परिवर्तनाची असून नेतृत्व स्थापन करण्याची नाही. शेतकर्यावर आलेली ही वेळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आली आहे. सरकारचे आयात धोरण हे  शेतकर्यांसाठी मारक ठरत आहे. स्वामीनाथ आयोगाची शिफारस स्वीकरली असती तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता. जीएसटी, नोटबंदीचा शेतकर्यानां फटका बसला आहे. शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी १९३ संघटना एकत्र आल्या असून शेतकरी प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीसाठी दहा मे रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक लाख सह्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: Discussion of Modi's defeat will be on top of tea: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.