स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक नेताजींवर रंगले चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:01+5:302021-02-08T04:30:01+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त येथील आझाद हिंद संघटनेच्या वतीने स्थानिक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त येथील आझाद हिंद संघटनेच्या वतीने स्थानिक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक नेताजी या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद देशमुख होते. साहित्यिक सुरेश साबळे, कथाकार बबन महामुने, ग्रंथालय चळवळीचे साहित्यिक गणेश तायडे, डॉ. दुर्गासिंग जाधव, सलीम शाह, कवी मनोहर पवार, शाहिना पठाण, रणजितसिंह राजपूत, आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. नेताजी सुभाषचंद्र बोस, तानूबाई बिर्जे, बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमांना अभिवादन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जागतिकीकरणामुळे शेतकऱ्यांची श्रममूल्य नाकारणारी व्यवस्था अस्तित्वात आली. नवीन आव्हाने समोर आली. संकटेही वाढली. या अवस्थेत शेतकऱ्यांचे मानसिक भरणपोषण करण्याची गरच आहे. साहित्य संमेलनातून हे भरणपोषण होवू शकते. नेताजी जागर साहित्य संमेलनातून हा प्रयत्न यशस्वी झाला असल्याचेही सदानंद देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. नेताजी जागर साहित्य संमेलनासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या विविध सांस्कृतिक मंच कलापथक, भजनी मंडळ, आझाद हिंद संघटनेचे विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, यांच्यासह पंकज शेजोळे, सतीश कोठारी, गजानन भारती, डॉ. विजयाताई काकडे, नीलेश तायडे, शाहीर डी. आर. इंगळे व संच, अनिता कापरे, नलिनीताई उन्हाळे, मनोरमा डोफे, प्रमिलाताई सुशीर, निर्मलाताई रोठे, योगीताताई रोठे, उमेश कायस्थ, पवन शिंदे, अरुण खंडारे, वैष्णवी राजपूत, अरविंद पिंजरकर, शाहीर बाबूसिंग राजपूत कलामंच आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी केले. आभार अक्षय महाराज तायडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखाताई निकाळजे, संजय एंडोले, आदेश कांडेलकर, अकील शाह, इमरान शाह, गणेश तायडे, सचिन पिंगळे, सिंधूताई अहिरे, माई कोकाटे आदींनी परिश्रम घेतले.