क्षय, एक्सडीआर रुग्णसंख्येत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:15 AM2017-08-11T01:15:41+5:302017-08-11T01:17:11+5:30
चिखली : जिल्हय़ात क्षय रोग व एक्सडीआर या क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची कबुली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.दीपक सावंत यांनी विधानसभेत आ.राहुल बोंद्रे यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : जिल्हय़ात क्षय रोग व एक्सडीआर या क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची कबुली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.दीपक सावंत यांनी विधानसभेत आ.राहुल बोंद्रे यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
बुलडाणा जिल्हय़ामध्ये शासकीय रुग्णालयातून उपलब्ध आकडेवारी पाहता क्षय रुग्णांच्या संख्येत वर्षाला सुमारे १५ टक्केची वाढ नोंदविल्या गेली आहे. सन २0१६ मध्ये बुलडाणा जिल्हय़ात ८३८ नवीन थुंकी क्षयरुग्ण नोंदविण्यात आले व त्यांची सरासरी दरमहा ७0 एवढी आहे. या रुग्णांना शासकीय रुग्णालयातून सर्वसाधारण औषधोपचार प्रथमत: सहा ते आठ महिने देण्यात येते. काही क्षय रुग्ण संपूर्ण उपचार पूर्ण करतीलच, असे नाही; त्यामुळे अनियमित तथा अपूर्ण औषधोपचार घेतल्यास सदर रुग्णांच्या जंतुमध्ये क्षय विरोधी औषध बदल प्रतिरोध तयार होतो. अशा रुग्णांना ड्रग रेजिस्टंट एक्सडीआर क्षयरुग्ण असे म्हणतात. अशा क्षय रुग्णांना २४ ते २७ महिने औषधोपचार घ्यावा लागतो. या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता त्यांना सरकारतर्फे मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येतो. असे असताना बुलडाणा जिल्हय़ामध्ये होणारी क्षय रुग्णांच्या संख्येतील वाढ गंभीर असल्याची बाब आमदार राहुल बोंद्रे यांनी सभागृहात बोलताना व्यक्त केली.
त्यावर सदर क्षयरोग आणि एक्सडीआर रुग्णांसाठी शासनाने औषधोपचाराची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट करीत, बुलडाणा जिल्हय़ामध्ये औषध सर्व शासकीय रुग्णालयात उपलब्ध असून, या रोगावर नियंत्रण मिळविण्याबाबत शासन कार्यवाही करीत आहे व रुग्णांना त्यासाठी त्रास होणार नाही, याची दक्षताही घेतली जात आहे, असे स्पष्ट करून वरील रोगावर नियंत्रण मिळविले जाईल, असा खुलासा सावंत यांनी केला आहे.