शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बँक व्यवस्थापकांना घेराव

By admin | Published: July 12, 2017 01:11 AM2017-07-12T01:11:57+5:302017-07-12T01:11:57+5:30

शेतकऱ्यांना त्वरित कर्जपुरवठा करा, या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमधील बँक व्यवस्थापकांना ११ जुलै रोजी घेराव घालण्यात आला.

To dispatch bank managers for the demands of farmers | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बँक व्यवस्थापकांना घेराव

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बँक व्यवस्थापकांना घेराव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : राज्य शासनाने केलेल्या शेतकरी पीक कर्जमाफीची विचारणा करण्याकरिता संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने संग्रामपूर तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बँक व्यवस्थापकांना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, त्या शेतकऱ्यांची यादी का प्रसिद्ध केल्या जात नाही तसेच शेतकऱ्यांना त्वरित कर्जपुरवठा करा, या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमधील बँक व्यवस्थापकांना ११ जुलै रोजी घेराव घालण्यात आला.
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी केली. यावेळी या आंदोलनात संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, संतोष राजनकर, अमोल घोडेस्वार, अनंत पळसकार, अकबरसेठ आदी काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या समस्यांचे बँक अधिकाऱ्यांना निवेदन
सोनाळा : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी करणे, खरीप पीक कर्ज त्वरित वितरित करणे यासह विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने मंगळवारी बँक अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.
यावेळी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करावी व द्यावी. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अशा शेतकऱ्यांची कारणासह यादी प्रसिद्ध करावी. पीक कर्जाचा त्वरित वित्त पुरवठा करावा, पीक विम्याची रक्कम कर्जात जमा करू नये. अशा प्रकारचे मागण्यांचे निवेदन स्टेट बँक शाखा सोनाळा यांना दिले असून, त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी राजेंद्र वानखडे, मोरे, जगन्नाथ विश्वकर्मा, प्रकाश देशमुख, प्रशांत गावंडे, रामदास पांडव, अमोल घोडेस्वार, शे.गणी, अरुण निंबोळकर, संतोष तायडे, नारायण ढोले, मुशीर अली, देवीदास भटकर, नंदूभाऊ दाभाडे, बाळासाहेब ढोकणे, तुकाराम वानखडे, गजानन खुमकर, गजानन वरूनकार, चंदन कोहरे, प्रमोद इंगळे, भिका भारसाकळे, सोनाजी गोरे, गजानन दामधर, जावेद अली आदींची उपस्थिती होती.

शासनाचे कोणत्याही प्रकारचे आदेश आलेले नाही. त्यामुळे कर्जमाफी नाही. थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नाही. पीक विम्याची रक्कम तसेच पासबुकचे दोन हजार डिपॉझिट हे शासनाच्या नियमानुसार काम केले आहे.
- सुरेश सोनोने, बँक मॅनेजर शाखा सोनाळा.

 

Web Title: To dispatch bank managers for the demands of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.