जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:21 AM2017-10-02T01:21:46+5:302017-10-02T01:23:04+5:30

बुलडाणा : जिल्हा परिषद शाळेत समान रिक्त जागा ठेवण्याच्या  धोरणानुसार विशेष श्रेणी भाग एक व दोनच्या शिक्षकांची बदली  प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३0 सप्टेंबरची मुदत देण्यात आली हो ती. मात्र या मुदतीपर्यंत जिल्ह्यात केवळ विस्थापीत शिक्षकांची  यादीच समोर आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे ४१२  शिक्षक विस्थापीत झाले असून त्यामध्ये मराठी माध्यमाचे ३९२  व उर्दू माध्यमाच्या २0 शिक्षकांचा समावेश आहे. मुदतीनंतरही  बदलीप्रक्रिया सुरूच असल्याने बदलीपात्र शिक्षकही गोंधळून  गेले आहेत. 

Displaced 412 teachers in the district | जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापित 

जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापित 

Next
ठळक मुद्देमराठी माध्यमाचे ३९२ तर उर्दूचे २0 मुदतीनंतरही बदली प्रक्रिया सुरूच 

ब्रम्हानंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा परिषद शाळेत समान रिक्त जागा ठेवण्याच्या  धोरणानुसार विशेष श्रेणी भाग एक व दोनच्या शिक्षकांची बदली  प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३0 सप्टेंबरची मुदत देण्यात आली हो ती. मात्र या मुदतीपर्यंत जिल्ह्यात केवळ विस्थापीत शिक्षकांची  यादीच समोर आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे ४१२  शिक्षक विस्थापीत झाले असून त्यामध्ये मराठी माध्यमाचे ३९२  व उर्दू माध्यमाच्या २0 शिक्षकांचा समावेश आहे. मुदतीनंतरही  बदलीप्रक्रिया सुरूच असल्याने बदलीपात्र शिक्षकही गोंधळून  गेले आहेत. 
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबतचे नविन  धोरण फेब्रुवारी २0१७ मध्ये जाहीर झाल्यापासून बदली प्रक्रिया  सुरू झाली होती. यामध्ये येणारे विविध अडथळे दूर झाल्यानंतर  राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यांतर्गत बदल्यांमधील  पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. अर्धे   शैक्षणिक वर्ष उलटत असतांनाही शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न  अद्यापही ऑनलाइन प्रणालीतच अडकलेला आहे. संवर्ग एक,  संवर्ग दोन, संवर्ग तीन आणि संवर्ग चार अशा गटांमध्ये जिल्हा  परिषद शिक्षकांच्या बदल्या होत असून जिल्ह्यातील हजारो  शिक्षक बदली प्रक्रियेमुळे गोंधळात आहेत. ग्रामविकास  विभागाने या बदली प्रक्रियेचे नवीन परिपत्रक काढून चालू  शैक्षणिक वर्षात विलंब झाल्याने कमीत कमी बदल्या करण्याचा  निर्णय घेतला त्यासाठी ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतही वाढ देण्यात  आली होती. परंतू या मुदतीपर्यंत केवळ जिल्ह्यातील विस्थापीत  शिक्षकांच्या याद्याच समोर आल्या आहेत. 
त्यामध्ये जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापीत असून मराठी  माध्यमाचे ३९२ व उर्दू माध्यमाचे २0 शिक्षकांचा समावेश आहे.  मराठी माध्यमाच्या शिक्षकांमध्ये विशेष श्रेणी एक मध्ये २६१ व  विशेष श्रेणी दोनमध्ये १३१ शिक्षकांचा समावेश आहे. मराठी  माध्यमामध्ये बुलडाणा तालुक्यात विशेष श्रेणी एक मध्ये ५९ व  श्रेणी दोनमध्ये ३६, चिखली तालुक्यात श्रेणी एकमध्ये ७0 व  श्रेणी दोनमध्ये २0, खामगाव श्रेणी एकमध्ये १२ व श्रेणी  दोनमध्ये २१, देऊळगाव राजा श्रेणी एकमध्ये २९ व श्रेणी  दोनमध्ये ७, मोताळा श्रेणी एकमध्ये ७ व श्रेणी दोनमध्ये १७,  लोणार श्रेणी एकमध्ये १४ व श्रेणी दोनमध्ये एक, मलकापूर श्रेणी  एकमध्ये ३ व श्रेणी दोनमध्ये ७, मेहकर श्रेणी एकमध्ये ३0 व  श्रेणी दोनमध्ये ७, जळगाव जा. श्रेणी एकमध्ये ६ व श्रेणी  दोनमध्ये २, नांदुरा श्रेणी एकमध्ये ३ व श्रेणी दोनमध्ये १, संग्राम पूर  श्रेणी एकमध्ये ३, शेगाव श्रेणी एकमध्ये ११ व श्रेणी दोनमध्ये  १0, सिंदखेड राजा तालुक्यात श्रेणी एकमध्ये १४ व श्रेणी  दोनमध्ये २ शिक्षक विस्थापीत झाले आहेत. मुदतीनंतरही बदली  प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बदलीपात्र शिक्षक गोंधळले आहेत.  लांबत असलेल्या या  शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे विद्या र्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. 

आज दुपारपर्यंंत भरावे लागणार आवेदनपत्र 
संवर्ग एक व संवर्ग दोनमुळे जे ४१२ शिक्षक विस्थापीत झाले  त्यांना पुढील प्रक्रियेसाठी २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत  आवेदनपत्र भरावे लागणार आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतरही  शिक्षक बदलीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता आवेदनपत्र  भरल्यानंतर पुन्हा किती दिवस प्रक्रिया लांबणार, असा प्रश्न  शिक्षकांना पडत आहे. या लांबणार्‍या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांंकडे  शिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.

असे आहेत उर्दू माध्यमाची विस्थापित पदे
जिल्हा परिषद अंतर्गत उर्दू माध्यमाचे संवर्ग एक व संवर्ग  दोनमधून २0 शिक्षक विस्थापीत झाले आहेत. त्यामध्ये संवर्ग  एकमध्ये  १७ व संवर्ग दोनमध्ये केवळ तीन शिक्षकांचा समावेश  आहे. बुलडाणा तालुक्यात सात, चिखली दोन, खामगाव सहा,    देऊळगाव राजा एक, मोताळा एक, मलकापूर एक, नांदुरा एक,  शेगाव एक असे पदे विस्थापीत झाले आहेत. 

Web Title: Displaced 412 teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.