बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:45 AM2017-12-19T00:45:26+5:302017-12-19T00:46:10+5:30

बुलडाणा : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्र दिव्यांगात येणार्‍या ९  प्रवर्गास दिले जाते. त्या प्रवर्गात १२ प्रवर्गांची वाढ करण्यात आली आहे; मात्र जनजागृती अभावामुळे नवीन समावेश १२ प्रवर्गाचे जवळपास ३0 हजारावर दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

Displaced from Divyang's new schemes in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित

बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित

Next
ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव नवीन १२ प्रवर्गांचा समावेश

हर्षनंदन वाघ। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्र दिव्यांगात येणार्‍या ९  प्रवर्गास दिले जाते. त्या प्रवर्गात १२ प्रवर्गांची वाढ करण्यात आली आहे; मात्र जनजागृती अभावामुळे नवीन समावेश १२ प्रवर्गाचे जवळपास ३0 हजारावर दिव्यांग नवीन योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आज केवळ नऊ दिव्यांग प्रवर्गात येणार्‍यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. 
यामुळे मोजक्याच दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे.  केंद्राने १७ डिसेंबर २0१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. ९ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. यात पक्षाघातापासून ते कंपवात रोगाचा समावेश करण्यात आला आहे; मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ३0 हजारावर दिव्यांग बांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत. नवीन दिव्यांग बांधवांमध्ये १२ प्रवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अध्ययन अक्षम म्हणजे ज्याला वाचन, लेखन करण्यास अवघड जात असेल, उलटे अक्षर लिहित असेल त्याचाही समावेश दिव्यांगांच्या प्रवर्गात केला आहे. 
यासोबतच मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बुटकेपणा, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी म्हणजे मल्टिपल स्क्लेरोसिस, थॅलेसिमीया, अनुवांशिक रक्तविकार, सिकलसेल, अँसिड हल्ल्यात जखमी झालेले रुग्ण, कंपवात रोग यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी जनजागृतीची गरज असून, सर्वच स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

नवीन प्रवर्गाचा ३0 हजारांवर दिव्यांग बांधवांना फायदा
यापूर्वी दिव्यांगांसाठी केवळ ९ प्रवर्गांचा समावेश होता. केंद्राच्या नव्या कायद्यानुसार यात १२ प्रवर्गांची भर पडली आहे. यामुळे हा नवा कायदा जिल्ह्यातील जवळपास ३0 हजारांवर दिव्यांगांसाठी फायद्याचा ठरणार आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे.

सामाजिक कल्याण विभागाच्या  विविध योजनांचा फायदा नवीन प्रवर्गातील दिव्यांगांना देण्यास काहीच अडचण नाही. योजनांचा फायदा घेण्यासाठी दिव्यांगांचे प्रमाणपत्र असल्यास योजनेत समावेश करण्यात येईल.
-मनोज मेरत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा.

दिव्यांगांच्या प्रवर्गात नवीन प्रवर्गाचा समावेश केल्यामुळे गोरगरिब, निराधार दिव्यांगांना फायदा होणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणा व अधिकार्‍यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- नामदेव जाधव, जिल्हाध्यक्ष, 
भाजपा अपंग आघाडी सेल, बुलडाणा.

Web Title: Displaced from Divyang's new schemes in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.