रेतीच्या वाहतुकीवरून दाेन गटात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:14+5:302021-03-07T04:32:14+5:30
दुसरबीड : रेतीच्या वाहतुकीवरून दाेन गटात वाद झाल्याची घटना हिवरखेड पूर्णा येथे ६ मार्च राेजी घडली. याप्रकरणी परस्परविराेधी तक्रारीवरून ...

रेतीच्या वाहतुकीवरून दाेन गटात वाद
दुसरबीड : रेतीच्या वाहतुकीवरून दाेन गटात वाद झाल्याची घटना हिवरखेड पूर्णा येथे ६ मार्च राेजी घडली. याप्रकरणी परस्परविराेधी तक्रारीवरून पाेलिसांनी दाेन्ही गटातील लाेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिवरखेड पूर्णा येथील खडकपूर्णा नदीच्या पात्रातील रेतीघाटांची हर्रासी झाली आहे. रेती नेण्यावरून कैलास दादाराव दहेकर व सुनील जिजाबा गाेरे यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी कैलास दादाराव दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी सुनील जिजेबा गोरे, अंकुश रामदास गोरे, प्रकाश कारभारी गोरे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटाच्या सुनील जिजाबा गोरे यांच्या तक्रारीवरून कैलास दादाराव दहेकर हिवरखेड पूर्णा व अंकुश कुर्धने देऊळगाव मही यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास किनगाव राजा पोलीस स्टेशनचे बीट जमादार दराडे करीत आहेत.