वादग्रस्त शेतरस्ता झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:36+5:302021-05-31T04:25:36+5:30

दरेगाव येथील शेतकरी विष्णू बाबूराव जायभाये व अभय दत्तात्रय बंगाळे, स्वप्नील दत्तात्रय बंगाळे या शेतकऱ्यांचे रस्त्यावरून गेल्या बारा वर्षांपासून ...

The disputed farm road was cleared | वादग्रस्त शेतरस्ता झाला मोकळा

वादग्रस्त शेतरस्ता झाला मोकळा

Next

दरेगाव येथील शेतकरी विष्णू बाबूराव जायभाये व अभय दत्तात्रय बंगाळे, स्वप्नील दत्तात्रय बंगाळे या शेतकऱ्यांचे रस्त्यावरून गेल्या बारा वर्षांपासून वाद होते. दरम्यान, सिंदखेड राजा तहसीलचे नायब तहसीलदार प्रवीण लटके यांनी दरेगाव येथील शेत रस्त्याच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांच्या बाजू ऐकून घेतल्या. दोन्ही शेतकऱ्यांना महसूल विभागातील बाजू समजावून सांगितल्या. गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर तोडगा काढला. नायब तहसीलदार यांनी मांडलेला मुद्दा लक्षात आल्याने दोन्ही शेतकऱ्यांनी यावर सहमती दर्शवली. दोन्ही शेतकऱ्यांचा गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर जागच्या जागीच मिटविण्यात नायब तहसीलदार यांना यश आले. शेत रस्ता ही खुला करून दिला. यावेळी मंडळ अधिकारी आनंद राजपूत, तलाठी विश्वास शेळके, विष्णू जायभाये, विठोबा मांटे, अक्षय बंगाळे हे हजर होते.

Web Title: The disputed farm road was cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.