दोन गटात वाद; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:01 PM2020-12-20T12:01:50+5:302020-12-20T12:01:56+5:30

Crime News बोरीअडगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली.

Disputes between two groups; Charges filed against eight persons | दोन गटात वाद; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

दोन गटात वाद; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण तापायला लागले असून तालुक्यातील बोरीअडगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी ८जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत दत्तात्रय पंजाबराव टिकार ( २४ ) यांनी ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली की काल सायंकाळी गावातीलच भागवत हरिभाऊ टिकार याने तू तुझ्या वहिणीला निवडणुकीला उभे कसे करतो तसेच पुरूषोत्तम गजानन टिकार याने एकदम येवून डोक्यावर तलवार मारून जखमी केले . तर हरिभाऊ ज्ञानदेव टिकार व गजानन ज्ञानदेव टिकार यांनी छातीवर लाथा मारल्या . या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरूध्द कलम ३२४ , ५०४,५०६,३४ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे . तर दुसऱ्या बाजुने पुरूषोत्तम गजानन टिकार यांनी पोस्टेला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , त्यांच्या मोबाईल शॉपीची दत्तात्रय पंजाबराव टिकार यांच्याकडे ८०० रू . उधारी असून हे पैसे मागितले असता त्याने अश्लिल शिविगाळ केली तसेच याच कारणावरून सुधीर बाळू उर्फ विश्वासराव टिकार रामरतन विनायकराव टिकार व अमोल विश्वासराव टिकार यांनी लोटपोट करून जीवे मारण्याची धमकी दिली .या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरूध्द कलम २९४,३२३,५०६ , ३४ भादंबीनुसार गुन्हा दाखल केला आहे .
 

Web Title: Disputes between two groups; Charges filed against eight persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.