थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित!

By admin | Published: May 25, 2017 12:53 AM2017-05-25T00:53:07+5:302017-05-25T00:53:07+5:30

बुलडाणा : महावितरणच्या परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे थकबाकी प्रलंबित असल्यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

Disruption of power supply will be broken! | थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित!

थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महावितरणच्या परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे थकबाकी प्रलंबित असल्यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे बुलडाणा मंडळामध्ये असलेल्या पंधरा उपविभागामध्ये एकूण २ लाख ८ हजार २१९ ग्राहकांकडे २३ कोटी ५१ लाख ३५ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये बुलडाणा उपविभागात १६ हजार ८९४ ग्राहकांकडे १ कोटी ६९ लाख ७४ हजार, चिखली उपविभागात २१ हजार ७८४ ग्राहकांकडे २ कोटी १७ लाख ८२ हजार, देऊळगाव राजा उपविभागात १२ हजार १६३ ग्राहकांकडे २ कोटी ७ लाख ८६ हजार, धाड उपविभागात ९ हजार ९७ ग्राहकांकडे ७३ लाख ५२ हजार, सिंदखेड राजा उपविभागात १२ हजार ८७० ग्राहकांकडे १ कोटी ४५ लाख २३ हजार, खामगाव शहर उपविभागात ११ हजार ३७ ग्राहकांकडे १ कोटी ७९ लाख ६५ हजार, खामगाव ग्रामीण उपविभागात १६ हजार ३०६ ग्राहकांकडे १ कोटी ४७ लाख ६७ हजार, लोणार उपविभागात १० हजार ८१४ ग्राहकांकडे १ कोटी ५९ लाख ५४ हजार, मेहकर उपविभागात १९ हजार ६०८ ग्राहकांकडे २ कोटी ९५ लाख २९ हजार, संग्रामपूर उपविभागात ११ हजार २३० ग्राहकांकडे ८८ लाख ४७ हजार, शेगाव उपविभागात १० हजार ८८५ ग्राहकांकडे १ कोटी ३१ लाख ८ हजार, जळगाव जामोद १५ हजार ६१७ ग्राहकांकडे १ कोटी ७७ लाख ३९ हजार, मलकापूर उपविभागात १२ हजार २१३ ग्राहकांकडे १ कोटी ३५ लाख ७ हजार, मोताळा उपविभागात १३ हजार ७४८ ग्राहकांकडे १ कोटी २१ लाख ८२ हजार आणि नांदुरा उपविभागात १३ हजार ९५३ ग्राहकांकडे १ कोटी १ लाख १३ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असून, नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते.
थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.

Web Title: Disruption of power supply will be broken!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.