नवीन विकास कामांना आचारसंहितेचा खोडा!

By admin | Published: January 22, 2017 02:57 AM2017-01-22T02:57:41+5:302017-01-22T02:57:41+5:30

नवनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या उत्साहावर विरजण.

Dissatisfaction with new development works! | नवीन विकास कामांना आचारसंहितेचा खोडा!

नवीन विकास कामांना आचारसंहितेचा खोडा!

Next

जळगाव जामोद, दि. २१ नवनियुक्त नगराध्यक्ष सीमा डोबे व १८ नगरसेवक यांनी पदभार स्वीकारताच प्रथम पदवीधर मतदारसंघाची व नंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे नगराच्या नवीन विकास कामांना तर खोडा बसलाच; पण नवीन लोकप्रतिनिधींच्या उत्साहावरसुद्धा विरजण पडले आहे.
नगर परिषदेची गत एक महिन्यापासून सर्वसाधारण सभा नाही. विषय समित्यांचे गठन झाले; परंतु त्याचाही सभा नाही. नगर परिषदेचे कामकाज कसे असते, याची उत्सुकता नवीन नगरसेवकांना असते; परंतु आचारसंहितेमुळे नगर परिषदेत सभेनिमित्त जाण्याची संधीसुद्धा नगराध्यक्ष सीमा डोबे व नवीन नगरसेवकांना नाही. नगर परिषदेत विविध विकास कामांसाठी निधी येत राहतो. तो निधी सर्वसाधारण सभेत किंवा विषय समि त्यांच्या सभेत कशाप्रकारे खर्ची घालावा, याची चर्चा होते; परंतु ही संधीसुद्धा नवीन नगरसेवकांना मिळाली नाही. नगरसेवकांना व नगराध्यक्षांना अधिकृतरीत्या आतापर्यंत फक्त तीन वेळा नगर परिषदेत जाण्याचा योग आला. नवीन नगराध्यक्षांनी ज्या दिवशी पदभार घेतला, तेव्हा उपाध्यक्षाची व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली तेव्हा आणि विषय समितीची निवड झाली तेव्हा अशा तीन वेळा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे नगर परिषद पदार्पण झाले होते. त्यानंतर सहज म्हणून नगरसेवक व नगराध्यक्ष हे नगर परिषदेत गेले असतील; परंतु आचारसंहि तेमुळे कोणतीही सभा झाली नाही. त्यामुळे मोठय़ा मेहनतीने मिळविलेल्या विजयाचा आनंद नगराध्यक्ष सीमा डोबे व नगरसेवकांना अद्याप घेता आला नाही. तशीच स्थिती नवीन विकास कामांची आहे. मागच्या बॉडीत जी विकास कामे मंजूर झाली होती, ती कामे मोठय़ा प्रमाणावर जळगाव नगरात सुरू आहेत.

Web Title: Dissatisfaction with new development works!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.