जि. प. शाळांतील शौचालयांची अवस्था वाईट; विद्यार्थी उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:25+5:302021-02-17T04:41:25+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते. तसेच ग्रामस्थांना शाैचालये बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र, जिल्हा परिषद ...
जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते. तसेच ग्रामस्थांना शाैचालये बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र, जिल्हा परिषद शाळांमध्येच प्रसाधनगृह नसल्याचे चित्र आहे. काही शाळांमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. अनेकांचे दरवाजे तुटलेले असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर लघुशंका आणि शौचास जावे लागत आहे. प्रशासनाने माेडकळीस आलेली व ज्या शाळांमध्ये शाैचालये नाहीत त्यांचा शाेध सुरू केला आहे. या आहेत अडचणी -
जिल्ह्यातील जि. प. शाळांतील शौचालये किंवा प्रसाधनगृहांची अवस्था वाईट असल्याने पाचवी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी बाहेर जावे लागतेच शिवाय पाचवी ते सहावी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास बसावे लागते. यामुळे स्वच्छता अभियानालाच तडे जात आहेत. शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन शौचालय बांधणे गरजेचे आहे.
४६ शाळांत स्वच्छतागृहेच नाहीत
जिल्ह्यातील ९० शाळांतील शौचालयांची अवस्था वाईट असताना ४६ शाळांत शौचालयेच नाहीत. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी बाहेर जावे लागते. प्रामुख्याने मुलींना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने या प्रकाराची दखल तातडीने घेण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.