रुग्णालयांना २३१ रेमडेसिविरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:54+5:302021-05-15T04:33:54+5:30
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढती आहे. मात्र त्या तुलनेत त्याचा पुरवठा कमी होत आहे. त्यातून मधल्या काळात जिल्ह्यात रेमडेसिविर ...
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढती आहे. मात्र त्या तुलनेत त्याचा पुरवठा कमी होत आहे. त्यातून मधल्या काळात जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाला होता. नांदुरा व बुलडाणा येथे अशी दोन प्रकरणे उघडकीस आली होती. एकंदरीत तुटवडा पाहता या इंजेक्शनचे न्यायपद्धतीने कोविड समर्पित रुग्णालयांना वाटप करण्याच्या दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत या इंजेक्शनचे वाटप गेल्या महिन्यापासून प्रशासनाने हाती घेतले आहे. सोबतच आपत्कालीन स्थितीसाठी प्राप्त इंजेक्शनमधील १० टक्के साठा राखीव ठेवण्यात येत आहे. यापूर्वी बऱ्याचदा हा साठाही जिल्हा प्रशासनाने वितरित केलेला आहे. दुसरीकडे सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरीत्या व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांकरिताच प्राधान्याने करावा, असे आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आलेले आहे.